विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी तिघांनाही ED चा दणका, 9 हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित
बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या तीन कर्जबुडव्यांना आता ईडीने चांगलाच दणका दिला आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची 9 हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी […]
ADVERTISEMENT

बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या तीन कर्जबुडव्यांना आता ईडीने चांगलाच दणका दिला आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची 9 हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.
ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची 18 हजार कोटींहून अधिक किंमत असलेली संपत्ती जप्त केली होती. संपत्ती निवारण अधिनियम 2002 म्हणजेच PMLA कायद्याच्या अन्वये ही संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 371.17 कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
PNB SCAM :’मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करावं’ डोमनिका सरकारची कोर्टात मागणी
ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. “ईडीने फक्त संपत्ती निवारण अधिनियम 2002 अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात 18,170.2 कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी 80.45 टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापैकी 9371.17 कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे,” अशी माहिती ईडीने दिली आहे.










