हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातले 8 सिंह Corona बाधित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट ही आपल्या सगळ्यांसाठीच भयंकर अशी ठरली आहेच. मात्र आता प्राण्यांनाही याचा फटका बसला आहे. हैदराबाद येथील 8 सिंहाना कोरोनाची बाधा झाली आहे. हैदराबादच्या नेहरू झुऑलॉजिकल पार्कमध्ये (NZP) 24 एप्रिल रोजी 8 सिंहांचे नाकातील, गळ्यातील आणि श्वास नलिकेतील नमुने घेण्यात आले होते. या सिंहांना अॅनेस्थेशिया देऊन मग ते नमुने घेतले होते. त्यांचे नमुने आज पॉझिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रिपोर्ट्स नुसार या आठ सिंहांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

‘या’ गावात कोरोनापासून संरक्षणासाठी पाळीव प्राण्यांनीही लावला जातो आहे मास्क

नेहरू झुऑलॉजिकल पार्कचे संचालक हे डॉक्टर सिद्धानंद कुकरेती यांनीही याबाबत माहिती दिली आहे. सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत. तसंच या आठही सिंहांना आयोसेलेट करण्यात आलं आहे, तर त्यांच्यावर कोरोनासाठीचे उपचारही सुरू करण्यात आले आहेत. सध्या हे आठही सिंह उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या दैनंदिन क्रिया योग्य प्रमाणात सुरू आहेत. तसंच ते त्यांचं जेवणही व्यवस्थित घेत आहेत असंही प्राणी संग्रहालयाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मांजरीचं शेपूट कापल्याप्रकरणी थेट मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार

हैदराबाद शहरातील वाईल्डलाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. गिरीश उपाध्ये यांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या एका प्राणी संग्रहालयात 8 वाघ सिंहाना कोरोनाची बाधा झाली होती. याधी हाँगकाँगमध्ये काही कुत्रे आणि मांजरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. मात्र भारतात एकाही प्राण्याला अशा प्रकारची बाधा झालेली नव्हती मात्र हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयात पहिल्यांदाच आठ सिंहांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

24 एप्रिलला प्राणी संग्रहालयातील पशू वैद्यकांना काही सिंहाना भूक न लागणे, नाकातून पाणी गळत असणे अशी लक्षणं आढळली ज्यानंतर त्यांना अॅनेस्थेशिया देऊन त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचे जे निकाल आले आहेत त्यात हे आठही सिंह पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. चार सिंह आणि चार सिंहिणी पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर प्राणी संग्रहालय हे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्राणीसंग्रहालयातले 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यानंतर या सिंहांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT