एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना झालेली अटक यानंतर मुंबई आणि ठाणे पोलीस दलातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. मुंबईत ATS मध्ये कार्यरत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची उचलबांगडी करुन त्यांना थेट गोंदीयात पाठवण्यात आलं आहे. ६ मे रोजी ADG […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना झालेली अटक यानंतर मुंबई आणि ठाणे पोलीस दलातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. मुंबईत ATS मध्ये कार्यरत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची उचलबांगडी करुन त्यांना थेट गोंदीयात पाठवण्यात आलं आहे. ६ मे रोजी ADG (Estlibshment) कार्यालयातर्फे काही महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या ऑर्डरमध्ये दया नायक यांना ATS मधून मुक्त करण्यात आलं असून त्यांनी गोंदीयात आपला पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
‘मटणवाले चाचा’ बनून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली पोलिसांची ‘शाळा’
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला होता. ज्यात दया नायक हे महत्वाचा हिस्सा होते. सचिन वाझेंविरोधात महत्वाचे पुरावे गोळा करण्यात ATS च्या टीमचा मोठा वाटा होता ज्यात दया नायक यांनीही मोलाची भूमिका बजावली होती. दया नायक यांच्यासोबतच मुंबई क्राईम ब्रांच आणि ATS मध्ये कार्यरत असणाऱ्या काही महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आलेली आहे. ज्यात ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या राजकुमार कोथिमरे यांचीही बदली करण्यात आली आहे. कोथिमरे हे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जवळचे मानले जातात. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला लागलेला धक्का आणि हिरेन हत्या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांना झालेली अटक यानंतर इमेज सुधारण्यासाठी या बदल्या करण्यात आल्याचं बोललं जातंय.
हे वाचलं का?
याचसोबत ठाणे पोलीसांमध्ये गेल्या ४ वर्षांपासून क्राईम ब्रांच युनिट १ चे प्रमुख इन्स्पेक्टर नितीन ठाकरे यांचीही नंदूरबारला बदली करण्यात आलेली आहे. अँटेलिया प्रकरणानंतर राज्य सरकारने परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करत हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवला. यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी मागितल्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली होती. हेमंत नगराळे यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरही त्यांनी काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
याचसोबत ४ मे रोजी ADG (Estlibshment) कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार आणखी ४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. ज्यात मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचमध्ये काम केलेल्या नंदकुमार गोपाले यांना जालना पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, पोलीस इन्स्पेक्टर सुधीर दळवी यांना दौंड येथील पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, इन्स्पेक्टर सचिन कदम यांना औरंगाबादमध्ये तर इन्स्पेक्टर केदारी पवार यांची जळगावला बदली करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT