दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केलं जाणार क्वारंटाईन, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई तक

दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे, अशात मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट संदर्भातली खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. काय म्हणाल्या आहेत मुंबईच्या महापौर? दक्षिण अफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, रशिया या देशातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे, अशात मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट संदर्भातली खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणाल्या आहेत मुंबईच्या महापौर?

दक्षिण अफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, रशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येईल असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. या देशामधून येणारा प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येईल असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. नव्या कोरोना व्हेरिएंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना तसंच नियोजन यासाठी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

WHO ने कोरोनाचा नवा विषाणू चिंताजनक असल्याचं अर्थात व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांनी आता प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

हे वाचलं का?