रशियाच्या Sputnik V लसीला केंद्राची मान्यता मिळाल्याची सूत्रांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रशियाच्या Sputnik V या लसीला केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतात आता कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींनंतर Sputnik V ही लसही उपलब्ध होणार आहे. Sputnik V ही एस्ट्राजेनेका प्रमाणे दोन डोस असणारी लस आहे. गेमालिया रिसर्च इंस्टिट्युट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने ही लस उपलब्ध केली आहे.

ADVERTISEMENT

Sputnik V लस 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी?

डॉ. रेड्डीज या प्रयोगशाळेने गेल्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे संमती मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात Sputnik V लसीची चाचणी केली होती. Sputnik V च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही लस 91 टक्के प्रभावी आहे. UAE, भारत, बोलारूस या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलं जातं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT