धमक असेल तर माझ्या जिल्ह्यातून निवडणूक लढवून दाखवा – गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना आव्हान
उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातलं वाकयुद्ध अजुनही सुरुच आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा बारामती मतदार संघात पराभव केला. या निवडणुकीत पडळकर यांचं डिपॉजिटही जप्त झालं. यानंतर अजित पवार कायम पडळकरांना उद्देशून या प्रसंगाची आठवण करुन देत असतात. गोपीचंद पडळकरांनीही अजित पवारांना आव्हान देत धमक असेल तर माझ्या जिल्ह्यात […]
ADVERTISEMENT
उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातलं वाकयुद्ध अजुनही सुरुच आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा बारामती मतदार संघात पराभव केला. या निवडणुकीत पडळकर यांचं डिपॉजिटही जप्त झालं. यानंतर अजित पवार कायम पडळकरांना उद्देशून या प्रसंगाची आठवण करुन देत असतात. गोपीचंद पडळकरांनीही अजित पवारांना आव्हान देत धमक असेल तर माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
“सांगली-सातारा जिल्हा सोडून मी पुण्यात येऊन लढलो. कोणतही पाठबळ नसताना १५ दिवसांत मी तयारी करुन लढलो. अजित पवार यांची मानसिकता बिघडल्यासारखी वाटत आहे. ते सारखे त्याच त्याच विषयांवर बोलत आहेत, राज्यात इतरही विषय आहे त्यांनी त्यावर बोलावं. अजित पवारांचा मुलगाही त्यांच्या जिल्ह्यात दीड-दोन लाखांनी पडला होता. धमक असेल तर अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी.”
बारामतीमध्ये माझं डिपॉजिट जप्त झालं हे मी स्विकारलं आहे. बारामतीकरांच्या निर्णयाचा मी आदर करतो, त्यांनी मला नाकारलं हे मी स्वीकारलं आहे. अजित पवार मला वारंवार अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू मी कुठेच अडकत नसल्यामुळे ते सारखं सारखं डिपॉजिटचं भांडवल करत असल्याचा टोला पडळकरांनी लगावला.
हे वाचलं का?
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पडळकरांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. सध्या राज्यात गाजत असलेल्या ओबीसी आरक्षणावरुन गोपीचंद पडळकर महाविकास आघाडी सरकारला दोषी धरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT