मनसेचे माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे यांची कोयत्याचे वार करून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

ADVERTISEMENT

कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी तालुकाप्रमुखाचा जुन्या भांडणाच्या कारणातून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वैभव विकास ढाणे, (वय 28, रा. जळगाव, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या मनसेच्या माजी तालुकाप्रमुख असलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना समोर आली. याबाबतची खबर कोरेगाव पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने रात्रीच घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिली.

वैभव ढाणे याचे हातपाय तोडून खून केला असल्याची माहिती समोर आली असून जुन्या भांडणाच्या कारणातून ही खूनची घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्या अनुषंगाने एका संशयिताचे नावही समोर येत असून कोरेगाव पोलीस त्यानुसार तपासाची सुत्रे हलवत आहे. हातपाय तोडून निर्घृणपणे वैभव ढाणे याला संपवण्यात आले असून यामागे नेमके कारण काय असावे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे जळगाव परिसरात ठाण मांडून बसले होते.

हे वाचलं का?

रात्री अचानकपणे ही घटना समोर आल्यानंतर जळगाव गावात खळबळ उडाली होती. कोयत्याने वार करुन वैभव ढाणे याचे हातपाय तोडण्यात आले असल्याचे समोर येत असून याबाबत त्याचा धाकटा भाऊ शुभम विकास ढाणे (वय 26, रा. जळगाव, ता. कोरेगाव) याने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या घटनेच्या अनुषंगाने रात्रभर तपास करत होते. एका संशयिताचे नाव समोर येत असले तरी आतापर्यंत तरी अद्याप कोणास ताब्यात घेतलेले नसल्याचे गणेश किंद्रे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT