पुण्यातील संतापजनक घटना! 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण; आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार

मुंबई तक

एका 25 वर्षीय तरुणीवरील बलात्काराच्या घटनेला आठवडा होत नाही, तोच आणखी एका सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं. एका 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून 8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची वानवडी पोलिसांनी माहिती दिली. पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

एका 25 वर्षीय तरुणीवरील बलात्काराच्या घटनेला आठवडा होत नाही, तोच आणखी एका सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं. एका 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून 8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची वानवडी पोलिसांनी माहिती दिली. पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एक रिक्षाचालक तिचा विश्वास संपादन करून रिक्षामधून एका खोलीत घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिच्यावर 8 जणांनी बलात्कार केला.

अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वेमध्ये कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे 8 ही आरोपींची ओळख पटवली आणि आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या.

हे वाचलं का?