औरंगाबादचं घाटी रूग्णालय RT-PCR टेस्टमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर
औरंगाबादचं घाटी रूग्णालय महाराष्ट्रातलं सर्वाधिक RT-PCR चाचण्या करणारं रूग्णालय ठरलं आहे. औरंगाबादच्या गव्हर्मेंट मेडिकल अँड कॉलेजमध्ये असलेल्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्वाधिक RTPCR चाचण्या करणाऱ्या राज्यातील प्रयोगशाळांची एक यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये औरंगाबादचं घाटी रूग्णालय पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात 3 लाख 9 हजार 700 […]
ADVERTISEMENT
औरंगाबादचं घाटी रूग्णालय महाराष्ट्रातलं सर्वाधिक RT-PCR चाचण्या करणारं रूग्णालय ठरलं आहे. औरंगाबादच्या गव्हर्मेंट मेडिकल अँड कॉलेजमध्ये असलेल्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्वाधिक RTPCR चाचण्या करणाऱ्या राज्यातील प्रयोगशाळांची एक यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये औरंगाबादचं घाटी रूग्णालय पहिल्या क्रमांकावर आहे.
ADVERTISEMENT
आत्तापर्यंत औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात 3 लाख 9 हजार 700 हून जास्त RT-PCR चाचण्या केल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पुण्याच्या दोन प्रयोगशाळा आहेत. ज्यांनी सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. आपण जाणून घेऊयात कोणत्या प्रयोगशाळेने किती चाचण्या केल्या आहेत..
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
हे वाचलं का?
22 एप्रिलला समोर आलेल्या आकडेवारीनुसार
औरंगाबाद घाटी रूग्णालय 3 लाख 9 हजार 700
ADVERTISEMENT
NIV पुणे 3 लाख 2 हजार 788
ADVERTISEMENT
BJGMC पुणे 2 लाख 99 हजार 880
महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या या औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात झाल्या आहेत.
कोरोना रुग्णावर कोणत्या परिस्थिती कोणते उपाय करावे?, या आहेत नव्या गाइडलाइन्स
महाराष्ट्रात 22 तारखेपर्यंत 2 कोटी 51 लाख 73 हजार 596 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 41 लाख 61 हजार 676 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 41 लाख 88 हजार 266 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 378 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 6 लाख 91 हजार 851 रूग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 74 हजार 45 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.81 टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर 1.52 टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रात आरटीपीसीआर चाचण्या सर्वात जास्त करण्यात औरंगाबादचा पहिला क्रमांक ठरला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT