पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट हा फडणवीसांचा आरोप नवाब मलिकांनी तोच रिपोर्ट दाखवून कसा खोडला?
पोलीस दलात मोठ्या पोस्टिंगसाठी एक रॅकेट सुरु असून त्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत आहे. हे प्रकरण उघडकीस आलं असून देखील यासंबंधी कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली नाही.’ असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारने एक देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी […]
ADVERTISEMENT
पोलीस दलात मोठ्या पोस्टिंगसाठी एक रॅकेट सुरु असून त्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत आहे. हे प्रकरण उघडकीस आलं असून देखील यासंबंधी कोणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली नाही.’ असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ADVERTISEMENT
यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारने एक देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी सादर केलेला अहवालच समोर आणला आहे. त्यातली उदाहरणं कशी चुकीची आहेत ते देखील दाखवून दिलं आहे.
पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट; जाणून घ्या फडणवीसांनी केलेले आरोप सोप्या शब्दात
हे वाचलं का?
यासाठी सरकारने चार अधिकाऱ्यांची उदाहरणं दिली आहेत. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती सांगितली. तसंच रश्मी शुक्ला यांनी दिलेला अहवाल हा संभाषणांवर आधारीत आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
१) संदीप बिष्णोई यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावरून नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी बदली करण्याचा निर्णय घेत असताना पैशांची देवाघेवाण झाली असा आरोप करण्यात आला आहे मात्र असं काहीही झालेलं नाही हे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
२) बिपीनकुमार सिंग अपर पोलीस महासंचालक यांची बदली लाचलुपचत प्रतिबंधक विभाग पिंपरी या ठिकाणी बदली करताना पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र तो चुकीचा आहे अशा प्रकारे बदली झालेली नाही असं मलिक यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
३) संजय वर्मा अपर पोलीस महासंचालक, व्हिजीलन्स म्हाडा यांची पोलीस आयुक्त ठाणे शहर या ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र त्यात काहीही तथ्य नाही असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
४) विनय चौबे अपर पोलीस महासंचालक, कायदा सुवस्था मुंबई यांची नागपूर वा पुणे या ठिकाणी बदली करण्यासाठी देवाणघेवाण झाली असा आरोप झाला आहे मात्र त्यातही तथ्य नसल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. या चारही बदल्या झालेल्या नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट करून देवेंद्र फडणवीस सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान करत आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांबाबत केलेलं वक्तव्य दिशाभूल करणारं-नवाब मलिक
या ट्रान्सफर रॅकेटमध्ये आणखी एक नाव समोर आलं होतं ते नाव होतं देवानंद भोजे यांचं. देवानंद भोजे हे सध्या अमरावती शहर पोलीस खात्यात स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला.
देवानंद भोजेंवर काय आरोप आहेत?
देवानंद भोजे हे सध्य़ा स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. देवानंद भोजे हे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या बदल्यांमध्ये सक्रिय आहेत. ते आपल्या राजकीय व इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या मार्फत मोठी रक्कम घेऊन बदल्यांची कामं करत आहेत. दयानंद भोजे यांनी दोन शेत जमिनी खरेदी करण्यासंबंधी तुळशीराम यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यासाठी ते २५ लाख रूपये देण्यासही तयार आहेत.
देवाननंद भोजे यांनी निलेश चातकरला व्हॉट्स अॅपवर चार-पाच बँक खात्यांचे नंबर आणि आयएफसी कोड पाठवले आहेत. प्रत्येक अकाऊंटवर किती पैसे पाठवायचे याचीही माहिती दिली आहे.
मात्र भोजे यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला असता, “माझ्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे आणि निखालस खोटे आहेत असं भोजे यांनी सांगितलं आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यांसाठी पैसे घेतले तसंच तुळशीराम यांच्याशी संपर्क साधला ही बाब खरी आहे. मात्र ती बाब खासगी आहे गेल्या २५ वर्षांपासून आम्ही संपर्कात आहोत. मी मुंबईत कोणताही फ्लॅट घेतलेला नाही मी सध्या भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहतो. मी काही चुकीचं केलं असतं तर तुमच्याशी बोललोच नसतो.” असं भोजे यांनी इंडिया टुडेला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT