Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!

मुंबई तक

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आदळल्यावर लसीकरण (Vaccination) हे किती महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत प्रत्येकाला पटलं आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तेवढ्याच लवकर आपण कोरोनापासून (Corona) मुक्त होऊ हे स्पष्ट आहे. अशावेळी आता राज्यातील जनता देखील लसीकरणासाठी जागरुक झाली आहे. पण महाराष्ट्रात (Maharashtra) अद्याप तरी म्हणावं तेवढ्या वेगाने लसीकरण काही होऊ शकलेलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आदळल्यावर लसीकरण (Vaccination) हे किती महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत प्रत्येकाला पटलं आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तेवढ्याच लवकर आपण कोरोनापासून (Corona) मुक्त होऊ हे स्पष्ट आहे. अशावेळी आता राज्यातील जनता देखील लसीकरणासाठी जागरुक झाली आहे. पण महाराष्ट्रात (Maharashtra) अद्याप तरी म्हणावं तेवढ्या वेगाने लसीकरण काही होऊ शकलेलं नाही. आता तर महाराष्ट्र सरकारकडे लसीचे डोसच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबविण्यात आलं आहे. अशावेळी लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार? असा सवाल आता महाराष्ट्रातील जनता विचारु लागली आहे. (How long will vaccination be smooth in Maharashtra Question of the people of Maharashtra)

1 एप्रिल 2021 पासून 45 वयाच्या वरील नागरिकांना लसीकरण सुरु झालं. सुरुवातीच्या काही दिवसात लसीकरण हे बऱ्यापैकी पार पडलं. पण जसजसं लोकांमध्ये याबाबत जागरुकता वाढू लागली तसतंस महाराष्ट्रात लसींचा तुटवडा हा जाणवायला लागला. बऱ्याचदा तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र ही बंद देखील ठेवावी लागली. मात्र असं असतानाचा लस उत्पादनाबाबतची नेमकी परिस्थिती जाणून न घेताच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण. खरं तर हा सरकारचा धाडसी निर्णयच होता. कारण 45 वयाच्या वरील नागरिकांनाच लस देण्यात अडथळा येत होता. कारण लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता.

मात्र, असं असताना देखील केंद्र सरकारने 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण हे सुरु केलं. पण अवघ्या 11 दिवसातच महाराष्ट्रात त्याला ब्रेक लागला. 45 वयाच्या वरील ज्या लाखो नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्या नागरिकांना अद्याप दुसरा डोस मिळू शकलेला नाही. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवून ते 45 वयाच्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp