तुम्हाला काळजी वाटतेय तुमच्या फुप्फुसांची ? तर मग ही चाचणी करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई तकः कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का हे तपासण्यासाठी घरच्याघरी चाचणी करण्याचा सल्ला राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे सिक्स मिनिट वॉक टेस्ट सजेस्ट केलीय.

ADVERTISEMENT

कोरोना हा आजार तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. अशावेळेस रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो, चालताना धाप लागते. कोरोनामुळे अनेकदा रुग्णांना ऑक्सिजन लावावा लागतो. योग्यवेळी ऑक्सिजन लावला नाही तर रुग्णांची प्रकृती अधिक ढासळू शकते. यासाठी वेळीच तुमच्या फुप्फुसांची घरच्या घरी चाचणी करणं आवश्यक आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत राज्यात जागरुकता करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

हे वाचलं का?

जाणून घेऊयात चाचणी कोणी करावी आणि कशी करावी आणि त्याचे निष्कर्ष कसे तपासावेत.

चाचणी कोणी करावी

ADVERTISEMENT

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

ADVERTISEMENT

अशी करावी चाचणी

– ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करा.

– त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये).

– यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये. मध्यम चालावे.

– सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्या.

– सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम आहे असे समजावं.

– समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी झाला असेल तर काळजी करू नका.

– दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करा. जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.

चाचणीचा निष्कर्ष कसा तपासायचा?

– जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल तर, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावं.

– ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये,

– ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT