Vaccine Certificate पासपोर्टशी कसा लिंक करायचा? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना लसीकरणाची गती आता पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण देखील कमी होत आहेत. अशा परिस्थितीत आता अनेक जण हे परदेशवारीची तयारी करत आहेत. परंतु आता परदेश प्रवास करताना आपले लसीचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की पासपोर्ट नंबर व्हॅक्सिन प्रमाणपत्राशी नेमका लिंक करायचा कसा.

ADVERTISEMENT

व्हॅक्सिन प्रमाणपत्रासह पासपोर्ट नंबर असा करा लिंक

आता Cowin अॅपद्वारे आपण सहजपणे हे काम करू शकाल. आरोग्य सेतूच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कमीत कमी वेळेत आपलं व्हॅक्सिन प्रमाणपत्रास हे पासपोर्ट नंबरशी कशाप्रकारे लिंक करु शकता. लिंक करण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.

हे वाचलं का?

  • CoWIN अ‍ॅपवर लॉग इन करा

  • त्यानंतर ‘Raise a Issue’ वर क्लिक करा.

  • ADVERTISEMENT

  • यावेळी पासपोर्ट पर्याय निवडा आणि आपली माहिती भरा

  • ADVERTISEMENT

  • त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून ‘पर्सन’ सिलेक्ट करा.

  • आता आपला पासपोर्ट क्रमांक सबमिट करा आणि मागितलेली इतर माहिती भरा

  • असे केल्यावर, आपल्याला पासपोर्ट लिंकसह आपलं नवीन व्हॅक्सिन प्रमाणपत्र मिळेल. ते डाउनलोड करा

  • आपल्याला हे देखील लक्षात असू द्या की, भारत सरकारने आपल्या मार्गदर्शक सुचनेमध्ये स्पष्ट केले आहे की, आता जर एखाद्या व्यक्तीला परदेशात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी जायचे असेल किंवा ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये जात असतील तर त्यांनी आता व्हॅक्सिन प्रमाणपत्र हे पासपोर्ट क्रमांकाशी लिंक करणं बंधनकारक असेल. त्यामुळे आता तेच काम सोपं करुन कोविन अ‍ॅपवरही तीच सुविधा देण्यात आली आहे.

    चुकीचे नाव कसे दुरुस्त करावे?

    तसे, काही लोकांची तक्रार देखील आहे की प्रमाणपत्र आणि पासपोर्टवर त्यांचे नाव वेगळ्या प्रकारे लिहिले गेले आहे. अशा परिस्थितीत आता ती चूक सुधारता येणार आहे. आरोग्य सेतूच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले आहे की अशा परिस्थितीत ‘नेम करेक्शनची’ची सुविधा देण्यात आली आहे. परंतु दुरुस्ती फक्त एकदाच केली जाऊ शकते. म्हणून सर्व तपशील काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT