Sharad Pawar: “मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही” राज ठाकरेंचा विषय एका वाक्यात संपवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही असं म्हणत शरद पवारांनी एका वाक्यात राज ठाकरेंचा विषय संपवला आहे. आज पुण्यात राज ठाकरेंची सभा होती. त्या सभेत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. एवढंच नाही तर बंदिस्त जागेत सभा घ्यायची आपल्याला सवय नाही पण पाऊस कधीही पडू शकतो. त्यामुळे निवडणुका नसताना पावसात कशाला भिजायचं? असं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला होता. या सगळ्याबाबत शरद पवारांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात राज ठाकरेंचा विषय संपवला.

ADVERTISEMENT

काय म्हणाले शरद पवार?

“मला त्यांच्याविषयी बोलून राज ठाकरेंचं महत्त्व वाढवायचं नाही” असं म्हणत राज ठाकरेंचा विषय शरद पवारांनी संपवला आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले होते राज ठाकरे?

भाषणाला सुरूवात केली त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला बंदिस्त सभा घ्यायची सवय नाही. पण सध्या पाऊस कधीही येऊ शकतो असं वातावरण आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत पावसात का भिजायचं? असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या पावसातल्या भाषणावरून त्यांना टोला लगावला. शरद पवार २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पाऊस पडला होता तेव्हा भिजले होते. त्या एका भाषणाने सगळं गणित फिरवलं. राज ठाकरेंनी तोच उल्लेख करत शरद पवारांना टोला लगावला.

ADVERTISEMENT

शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार. औरंगजेब शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता. तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी आला होता. मग काय शिवाजी महाराज यांच्यामध्ये आले होते का? स्वतःच्या सोयीसाठी इतिहास बदलू नका असंही म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांनी टीका केली.

ADVERTISEMENT

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT