लेखकाने वास्तवदर्शी लिखाण केलं की तो राष्ट्रविरोधी होतो-जावेद अख्तर
मराठी साहित्य संमेलनात जावेद अख्तर येणार म्हणून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांना बोलवण्यात आलं. तसंच ते काय बोलणार याची उत्सुकता होती. आज नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवत जे भाषण केलं ते सगळ्यांसाठीच महत्त्वाचं होतं. डोळ्यात अंजन घालणारं होतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. जावेद अख्तर यांनी साहित्य कला, […]
ADVERTISEMENT
मराठी साहित्य संमेलनात जावेद अख्तर येणार म्हणून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांना बोलवण्यात आलं. तसंच ते काय बोलणार याची उत्सुकता होती. आज नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवत जे भाषण केलं ते सगळ्यांसाठीच महत्त्वाचं होतं. डोळ्यात अंजन घालणारं होतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. जावेद अख्तर यांनी साहित्य कला, चित्रकला किंवा कोणत्याही कलेला राजाश्रय मिळतो त्यांना ती आवडत असते असं म्हटलं. मात्र जेव्हा एखादा साहित्यिक, कवी, विचारवंत, शायर हा सामान्य माणसाची दुःखं दाखवतो, वास्तवदर्शी लिखाण करतो, तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारे त्याला आधी वाईट ठरवायचे आता अँटी नॅशनल ठरवून मोकळे होतात असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पावसाचा खोडा, कोव्हिड ते ओमिक्रॉन वाचा काय आले अडथळे?
काय म्हणाले आहेत जावेद अख्तर?
हे वाचलं का?
मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपण आता कार्यक्रमाला सुरूवात करू असं म्हणत जावेद अख्तर यांनी भाषण सुरू केलं. मला जेव्हा हे निमंत्रण मिळालं तेव्हा मला खूप आनंद झाला. मात्र मी हादेखील एक विचार केला की मराठी साहित्य संमेलनात जाण्यासाठी मी पात्र आहे की नाही? मराठी साहित्य संमेलनात मी बोलू शकतो का? मग मला हे लक्षात आलं की मी हे वाचलं आहे की पेशव्यांच्या दरबारात अभंग, पोवाडा, भारूड हे सादर करणारे लोक असत. तिथे शायरही असत. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराबाबतही खरी आहे.
मी हा विचार केला ही हा मराठी साहित्याचा दरबार आहे. मी एक छोटामोठा शायर आहे. त्यामुळे मी या साहित्य संमेलनात आलो आहे. भाषा ही जगात यासाठी तयार झाली की मी बोलेन ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही बोलाल ते मला समजेल. मात्र आत्ता मी जे पाहतो आहे ते असं आहे की, भाषाच संवादाची भिंत म्हणून उभी राहू लागली आहे. आपल्या देशात अनेक भाषा आहेत, जगात अनेक भाषा बोलल्या जातात. इतक्या भाषा असल्याने आपण किती शिकणार? हा प्रश्नही आहेच. संस्कृतमध्ये ज्याला कूपमंडूक म्हटलं जातं.. आपली वृत्ती तशी होते. आपण आपली भाषा, आपली संस्कृती हेच आपलं जग आहे असं आपल्याला वाटतं. त्यावेळी आपल्याला विसर पडतो की आपण जे समजतो त्याबाहेरही जग आहे.
ADVERTISEMENT
‘आताची स्थिती पाहता हिंडता-फिरता अध्यक्ष निवडला पाहिजे’ कौतिकराव ठालेपाटील यांनी व्यक्त केली खंत
ADVERTISEMENT
मी 19 वर्षांचा होतो तेव्हा मुंबईत आलो. मी उत्तरेतून आलो, मला उर्दू येत होती, हिंदी येत होती. युरोपचं काही साहित्य प्रकार मी वाचले होते. त्यावेळी मला वाटत होतं की माझी भाषा, माझी संस्कृती हेच सगळं योग्य आहे. यापुढे फार काही नाही असं वाटत होतं. मी 20 वर्षांचा होतो त्यावेळी माझे काही मित्र मला एक मराठी नाटक बघायला घेऊन गेले. मी त्यांना सांगितलं की मला मराठी येत नाही. ते म्हणाले तू चल आमच्यासोबत आपण बघू. मी ते नाटक पाहिलं त्या नाटकाचं नाव होतं शांतता कोर्ट चालू आहे. ते नाटक पाहून मला वाटलं की मला कुणीतरी एक जबरदस्त चपराक दिली आहे. मला त्यादिवशी स्वतःची लाज वाटली कारण मला या महान लेखकाबाबत माहित नव्हतं. मी अशा परिवरातून आलो आहे जिथे साहित्यच होतं. मला माझं जग तेच आहे एवढंच वाटत होतं. मी विजय तेंडुलकर यांची इतर मराठी नाटकंही पाहिली. पु.ल. देशपांडेंसारख्या साहित्यिकाशी ओळख झाली. त्यांच्यासारखा अवलिया मी पाहिला नाही. जे लोक बाहेरून येतात ते वर्तमानातून भूतकाळात जातात.
अच्युत वझे माझे चांगले मित्र आहेत. तसंच इतरही माझे मित्र आहेत. माझे एक सर्जन मित्र आहेत आनंद जोशी त्यांना इतक्या मराठी कविता लक्षात आहेत जेवढ्या मला उर्दू कविता लक्षात आहे. मला ही मराठी माणसं भेटली आणि मला खजिना मिळाली. आपण बुद्धिबळ खेळत असताना बऱ्याचदा असं होतं की एखादा माणूस पाठून येतो. तो पाठून जे पाहू शकतो ते आपण खेळ खेळतानाही पाहू शकलेलो नसतो. माझंही तसंच झालं. मला मराठी साहित्य समजलं त्याचा मला खूप फायदा झाला. त्यामध्ये मला रूची निर्माण झाली.
800 वर्षे असो, 400 वर्षे असो पण मराठी साहित्यात तोच माणूस मोठा झाला आहे ज्याने सामान्यांशी संवाद साधला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांची सगळ्यांची संस्कृती ही लोकांशी जोडणारी आहे. मराठी साहित्यही असंच आहे. कवी तुलसीदास यांनी रामायणाची कथा रामचरित मानस लिहिलं गावा गावात ती कथा पसरली. कारण ती सामान्य माणसांची भाषा होती. मला यामध्ये समानता आढळते. जेव्हा एखादा साहित्यिक सामान्य माणसाला काही सांगण्याचा, त्याला घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही लोकांना वाईट वाटतं, त्यांच्या पोटात दुखतं. ही बाब योग्य नाही. जे मोठी माणसं असतात मग ते बादशहा, राजे, नवाब यांना कला आवडते. आत्ताच्याही काळात तसंच चित्र आहे. चांगल्या कलाकृती घडतात, कविता, साहित्यकृती या सगळ्यांना आवडतात. मात्र जेव्हा वास्तवदर्शी लेखन केलं जातं तेव्हा त्यावर प्रेम करणारे अँटी नॅशनल होतात असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT