अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, ७७ गावांना बसू शकतो पुराचा फटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोला जिल्ह्यात येत्या शुक्रवारपासून जोरदार अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या ४ दिवसांत जिल्ह्यात वीज, गारपीट आणि संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यातील ७७ गावांना पुराचा धोका आहे. नागपूर आणि पुणे वेधशाळेने याबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. यासाठी ७७ गावांमध्ये तात्पुरते निवारे उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रबर बोट, लाईफ जॅकेट व इतर साधनसामग्री जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी तयार ठेवली आहे.

याव्यतिरीक्त गरज लागल्यास पुणे आणि नागपूर येथील एनडीआरएफच्या पथकांचीही शोधकार्यासाठी मदत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन एनडीआरएफशी संपर्कात असून संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT