राज्यभरात धुमाकूळ घालणारा पाऊस विश्रांती घेणार – IMD ने दिली महत्वाची माहिती
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे. कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, अमरावती, नांदेड अशा अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. परंतू पुढचे काही दिवस पाऊस राज्यात विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आज […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे. कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, अमरावती, नांदेड अशा अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. परंतू पुढचे काही दिवस पाऊस राज्यात विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आज राज्यात नंदूरबारमध्ये मुसळधार तर नाशिक, जळगाव, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात.
Watch for #Nandurbar #Nashik #jalgaon #PuneGhat #SataraGhat areas?
IMD https://t.co/F7HUBtF0Ji— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 25, 2021
दरम्यान कोकणात भुस्खळनामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पावसाने उसंत घेतल्यास महाड, खेळ, चिपळूण या भागातलं जनजीवन रुळावर येण्यासाठी मदत होणार आहे. २६ जुलै रोजी राज्यात रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. २७ जुलै आणि २८ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
Sangli रेड झोनमध्ये, कृष्णा नदीची पातळी तब्बल 54 फुटांच्याही वर
याचसोबत पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २८ तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण २८ जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल असा अंदाज आहे. मात्र ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचंही IMD ने स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT