Pune: नाशिकसारखेच पुण्यातही हकनाक जीव गेले असते…
पुणे: नाशिकमध्ये (Nashik) मागील आठवड्यात ऑक्सिजन दुर्घटनेत (Oxygen leakage) निष्पाप 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना. 1 मे पुण्यातील (Pune) कोथरूड परिसरातील एका रुग्णालयात (Hospital) देखील गंभीर घटना घडली. 1 मे रोजी पुण्यातील कोथरूड पोलिसांना (Kothrud Police) फोन आला. तेव्हा त्यांना अशी विनवणी करण्यात आली की, ‘अहो साहेब आमच्या रुग्णालयात तासाभराचा ऑक्सिजन साठा असून […]
ADVERTISEMENT
पुणे: नाशिकमध्ये (Nashik) मागील आठवड्यात ऑक्सिजन दुर्घटनेत (Oxygen leakage) निष्पाप 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना. 1 मे पुण्यातील (Pune) कोथरूड परिसरातील एका रुग्णालयात (Hospital) देखील गंभीर घटना घडली.
ADVERTISEMENT
1 मे रोजी पुण्यातील कोथरूड पोलिसांना (Kothrud Police) फोन आला. तेव्हा त्यांना अशी विनवणी करण्यात आली की, ‘अहो साहेब आमच्या रुग्णालयात तासाभराचा ऑक्सिजन साठा असून 20 ते 22 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आम्हाला काही तरी मदत करा’, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ऑक्सिजन सिलेंडर, ड्युरा कंटेनर काही तासात रुग्णालयाला उपलब्ध करून दिला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे जवळजवळ 20 ते 22 रुग्णांचे जीव पोलिसांनी वाचविले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर देखील विशेष कौतुक केलं जात आहे.
या प्रसंगाबाबत कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डांगे म्हणाले की, ‘शनिवारी सकाळच्या सुमारास कोथरूड परिसरातील कृष्णा रुग्णालयामधून फोन आला. आमच्या हॉस्पिटलमध्ये 20 ते 22 रुग्ण आहेत. त्या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या सर्वांसाठी आता तासाभराचा ऑक्सिजन आमच्याकडे उपलब्ध आहे. तर आपण प्लीज काही तरी मदत करा.’ अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
‘चार’ भयंकर दुर्घटना ज्याने अवघा महाराष्ट्र हादरला अन् हळहळलाही…
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘मी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच एक whatsapp ग्रुप केला होता. त्यातील काही रुग्णालयासोबत लगेचच चर्चा केली. त्या चर्चेतून चार सिलेंडर मिळवेल आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात आले. तसंच यावर काम होईल का? अशी विचारणा देखील त्यांना केली. साधारण 4 ते 5 तास काम चालेल. त्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की, आमच्या ड्युरा कंटेनर आहे. तो आम्हाला शिवाजीनगर येथील एका प्लांटमधून भरून दिल्यास दिवसभराचे काम होईल. त्यानंतर आम्ही शिवाजीनगर येथील प्लांटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी लगेच मिळेल असे सांगितले. त्यानुसार आम्ही इस्कॉट करून दिला आणि पुढील तासाभरात रूग्णालयात ड्युरा कंटेनर उपलब्ध झाला.’
ADVERTISEMENT
दरम्यान, पोलिसांनी वेळीच योग्य ती तजवीज करत अनेक रुग्णांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळेच ‘मुंबई तक’कडून देखील पोलिसांना सलाम.
ADVERTISEMENT
‘माझी आई तडफडून मेली, अख्ख्या वॉर्डमधील सगळे पेशंट संपले’, नातेवाईकांचा आक्रोश
नाशिकची ऑक्सिजन गळतीची घटना नेमकी कशी घडली होती?
21 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयाजवळील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन रिफिल करताना अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली. ही गळती तब्बल अर्धा तास सुरु होती. या दुर्घटनेत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो रूग्णालय परिसरात सगळीकडे पसरला होता. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा ते पाऊण तास खंडीत झाला होता. जो नंतर पूर्ववत करण्यात आला. पण तोवर अनेकांनी आपले जीव गमावले होते.
या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतीव दुःख व्यक्त केलं होतं. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना अशाप्रकारे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT