मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होईना, दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत अद्यापही कोरोनाची स्थिती अटोक्यात आलेली नाही. कारण गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 10 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईतील 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मागील 24 तासात दगावले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची संख्या अटोक्यात येण्यासाठी मुंबई महापालिकेकडून बरेच प्रयत्न सुरु आहेत. मात्र, असं असताना दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेला काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत.

दरम्यान, आज (5 एप्रिल) दिवसभरात 7 हजार 019 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 82 हजार 004 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. डबलिंग रेट 38 दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

पुण्यात Corona रूग्णांवर उपचारांसाठी बेड्सचा तुटवड़ा, व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता

सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे सध्या मुंबईत 77 हजार 495 हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण येत असल्याचं दिसून येतंय. मुंबई आतापर्यंत 11 हजार 828 जण कोरोनामुळे दगावले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, आज दिवसभरात मुंबईत 47 हजार 922 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी 10 हजार 030 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ADVERTISEMENT

सध्या मुंबईत 2 हजार 007 आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. तर 1 हजार 122 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. याशिवाय 10 हजार 557 ऑक्सिजन बेड्स देखील तयार आहेत. मात्र असं असलं तरीही मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही फार वेगाने वाढत आहे.

महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण

सध्या मुंबईमध्ये 73 कंटेन्मेंट झोन आहेत. जे पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. तर संपूर्ण मुंबईत 740 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता तशा स्वरुपाच्या तपासण्या सुरु केलेल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण हे कठोर निर्बंध म्हणजे अघोषित लॉकडाऊनच आहे. असं मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्रच लिहलं आहे.

या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘या अघोषित लॉकडाऊनमुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा करुन निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT