पुणे : काँग्रेस भवनचा वाद! काँग्रेस-भाजप आमने-सामने; जगतापांनी कुलूप तोडल्यानंतर इंदापुरात तणाव
पुणे जिल्ह्यातील इंदापूरात काँग्रेस आणि भाजपमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. इंदापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनच्या मालकीवरून काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार तथा काँग्रेसचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आज इंदापुरात आमने-सामने आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काँग्रेस […]
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील इंदापूरात काँग्रेस आणि भाजपमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. इंदापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनच्या मालकीवरून काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार तथा काँग्रेसचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आज इंदापुरात आमने-सामने आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT
पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काँग्रेस भवनचे टाळे तोडत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच हर्षवर्धन पाटील यांनी भवनला टाळे ठोकत भवन खाजगी मालकीचेच असल्याचा दावा केला. त्यामुळे आज या भागात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर इंदापूर शहरातील काँग्रेस भवन बंद अवस्थेत आहे. या बंद काँग्रेस भवनचे कुलूप आमदार संजय जगताप यांनी प्रजासत्ताक दिनी तोडून आत प्रवेश केला आणि भवन काँग्रेसचेच असल्याचा दावा केला आहे. तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही मालमत्ता खासगी असल्याचा दावा केला आहे. ही जागा आणि इमारतीबाबत कुठलाही वाद नाही. ही जागा खासगी ट्रस्टची असून, इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी आहे, असा प्रतिदावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
हे वाचलं का?
आज (२६ जानेवारी) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी इंदापुरात येऊन बंद असलेल्या काँग्रेस भवनचे कुलूप हातोड्यानं तोडून आतमध्ये प्रवेश केला. हे भवन काँग्रेस पक्षाचे असून, सन १९७० पासून काँग्रेस भवन जनतेसाठी खुले करण्यात आले असा दावा जगताप यांनी केला. दरम्यान, काँग्रेस भवनच्या बंद अवस्थेतील इमारतीत प्रवेश केल्यानंतर इंदापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार जगताप यांचे पुष्पहार घालून व काँग्रेसचा ध्वज उंचावून स्वागत करण्यात आलं.
त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा काँग्रेस भवनला कुलूप लावले. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी आपण पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू असं सांगत उपस्थितांना पोलीस स्टेशनला बोलावलं. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलविण्यात आलं. या ठिकाणी इंदापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून शांतता बाळगावी. या जागेबाबत न्यायालयीन लढाई सुरू असून आत्ताच निर्णय देता येणार नाही, असं पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
या प्रकरणावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘ही खासगी मालमत्ता असून, अखिल भारतीय काँग्रेसचा आणि या मालमत्तेचा कसलाही संबंध नाही. ही ट्रस्टची जागा असून, ती ट्रस्टचीच राहणार आहे. सध्या त्याच्या चाव्या आमच्याकडेच आहे. याबाबत कुठलाही वाद नसून, भवन आमचे आहे म्हणणाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश आणावा,’ असं पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी भवनच्या चाव्याही दाखवल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT