Independence Day : नेहरू ते मोदी आजवर स्वातंत्र्य दिनी झालेल्या महत्त्वाच्या घोषणा
पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी केलेली घोषणा ही आपल्या सगळ्यांच्या आजही लक्षात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे छायाचित्रात लॉर्ड माऊंटबॅटन आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत ‘कित्येक वर्षांपूर्वी आम्ही नियती बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि आता वेळ आली आहे जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेपासून मुक्त होऊ. पूर्णपणे नाही पण ते महत्वाचे आहे. आज […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी केलेली घोषणा ही आपल्या सगळ्यांच्या आजही लक्षात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे छायाचित्रात लॉर्ड माऊंटबॅटन आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत
हे वाचलं का?
‘कित्येक वर्षांपूर्वी आम्ही नियती बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि आता वेळ आली आहे जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेपासून मुक्त होऊ. पूर्णपणे नाही पण ते महत्वाचे आहे. आज रात्री 12 वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल’ पंडित नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ला केलेली घोषणा
ADVERTISEMENT
पंडित नेहरू यांच्याप्रमाणेच लाल बहादुर शास्त्री हेदेखील आपल्या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची कारकीर्द अल्पकाळ ठरली. मात्र ती लक्षात राहण्याजोगी होती यात आजही कुणाला शंका नाही
ADVERTISEMENT
15 ऑगस्ट 1964 ला लाल बहादुर शास्त्री यांनी म्हटलं होतं की ‘जर कुठलाही देशाने आमच्या विरोधात शस्त्र उचललं तर आमचं उत्तरही आम्ही त्यांना शस्त्र उचलून देऊ. आम्ही हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. ‘
इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांची कारकीर्द अत्यंत आक्रमक आणि देशाला प्रगतीच्या वाटेवर नेणारी ठरली. त्यांनी आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लू स्टार सारखे निर्णय घेतल्याने त्यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द ही तशी वादग्रस्तही ठरली.
देशाला कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे असं महत्त्वाचं वक्तव्य इंदिरा गांधी यांनी केलं होतं. आपत्ती येते, दुष्काळ, अवर्षण या सगळ्या गोष्टी येतात. त्यातून मार्ग काढणं आणि त्यासाठी एकसंघ राहणं आवश्यक आहे असं इंदिरा गांधी यांनी म्हटलं होतं आणि गरीबी हटाव हा नाराही दिला होता.
देशाची फक्त आर्थिक प्रगती झाली पाहिजे असं नाही तर समाजाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे. यासाठी आम्ही योजना आणत आहोत. देशातल्या खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. भारतातील प्रत्येक वर्ग मग तो हरिजन असो किंवा अल्पसंख्य प्रत्येक घटकाची प्रगती झाली पाहिजे हे आमचे उद्दीष्ट आहे.
इंदिरा महिला योजना सुरू करण्यात आली मात्र काही कारणांमुळे ती राजीव गांधी यांच्या काळात सुरू होऊ शकली नाही. ती आम्ही सुरू करतो आहोत. महिला सक्षमीकरण करणं हे यामागचं उद्दीष्ट आहे असं वक्तव्य पी. व्ही. नरसिंहराव यांनी केलं होतं.
पोखरण सारखा अणूचाचणीचा प्रयोग देशात आधीच व्हायला हवा होता.. मात्र जगातल्या काही देशांनी दबाव टाकला होता त्यातून हा प्रयोग झाला. मात्र पोखरण अणू चाचणीने दाखवून दिलं की आपण आणि आपला देश कुठल्याही दबावाला समजलं आहे. आपण जे पाऊल उचलू ते आत्मरक्षणासाठी उचलू , हिंसेसाठी नाही असं वक्तव्य माजी आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. याचसोबत त्यांनी जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नाराही दिला.
आपला देश कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या कृषी क्षेत्राची प्रगती व्हायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचीही प्रगती आवश्यक आहे. येत्या काळात विज्ञान तंत्रज्ञान आणि शेती ही दोन्ही क्षेत्रं हातात हात घालून पुढे जातील. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी हे महत्त्वाचं आहे असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं होतं.
देश पुढे जायचा असेल तर स्किल इंडिया हे धोरण अवलंबलं पाहिजे. स्किल म्हणजेच कौशल्य जर का विकसित झाली तर देशातला तरूण वर्ग बेरोजगार राहणार नाही. त्यामुळेच स्किल इंडिया योजना आपण सुरू करत आहोत असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिला होता. 2014 मध्ये विकासाचा नाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.
2020 मध्ये जी कोरोनाची आपत्ती आली त्याचं सावट स्वातंत्र्यदिनावरही होतं. मात्र आरोग्य विभागात आपण कशी प्रगती केली, आपल्याला ते कोरोनाने कसं शिकवलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशद केलं होतं. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 ला केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT