Vaccine Shortage वर अदर पूनावाला म्हणतात देशात या महिन्यापर्यंत राहणार तुटवडा
1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यासाठीची मोहीम सुरू करण्यात आली खरी पण देशात अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो त्यामुळे अनेक राज्यांनी ही मोहीम पुढे ढकलली आहे. 44 ते पुढच्या वयोगटासाठीच लसी नाहीत. अशात आता 18 ते 44 या वयोगटासाठी लसी कुठून आणायच्या हा प्रश्न महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांसमोर आहे. हा लस तुटवडा कधीपर्यंत राहणार […]
ADVERTISEMENT
1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यासाठीची मोहीम सुरू करण्यात आली खरी पण देशात अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो त्यामुळे अनेक राज्यांनी ही मोहीम पुढे ढकलली आहे. 44 ते पुढच्या वयोगटासाठीच लसी नाहीत. अशात आता 18 ते 44 या वयोगटासाठी लसी कुठून आणायच्या हा प्रश्न महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांसमोर आहे. हा लस तुटवडा कधीपर्यंत राहणार याचं उत्तर आता सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
धमकीचे फोन, बड्या लोकांकडून दबाव…अदर पूनावाला देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या विचारात
काय म्हणाले आहेत अदर पूनावाला?
हे वाचलं का?
एका महिन्यात आम्ही 60 ते 70 मिलियन डोस तयार करतो. ही क्षमता100 मिलियन पर्यंत नेण्यासाठी आम्हाला जुलै महिना उजाडणार आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सगळ्यांना लसीकरणाची घोषणा केल्यानंतरच तुटवडा भासतो आहे. हा तुटवडा येते तीन महिने तरी भासणार आहे असं वक्तव्य अदर पूनावाला यांनी केलं आहे. कोव्हिशिल्ड या लसीचं उत्पादन 100 मिलियन प्रति महिना उत्पादन नेण्यासाठी आम्हाला जुलै महिना उजाडणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सिरम इन्स्टिट्युटला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
ADVERTISEMENT
सिरम इन्स्टिट्युटला बदनाम करण्याचा प्रयत्नही झाला असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. काही राजकीय नेत्यांनी आणि टीकाकारांनी सिरमला बदनाम केलं. लसींचं उत्पादन प्रतिदिन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सिरमला बदनाम करण्यात आलं. आमच्याकडे यासंदर्भात आधी कोणताही आदेश आला नव्हता. आम्हाला नव्हतं की आम्हाला एक वर्षात एक बिलियन पर्यंत लसी उत्पादित कराव्या लागतील. पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पादन वाढवण्यात येतं आहे अशी माहितीही अदर पूनावाला यांनी दिली. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी हे भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Serum Institute च्या अदर पुनावालांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा
आणखी काय म्हणाले आहेत अदर पूनावाला?
देशात कोरोनाची दुसरी लाट जानेवारीपासूनच येण्यास सुरूवात होईल असं अधिकाऱ्यांना, प्रशासनाला वाटलं नव्हतं. जानेवारी महिन्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये चांगली घट दिसून आली होती. त्यामुळे प्रत्येकाला वाटलं होतं की कोरोनाच्या पहिल्या लाटेचा भारताने यशस्वी मुकाबला केला आहे. दुसरी लाट इतक्या पटकन येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT