जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनी गहाण ठेवून 400 कोटींचं कर्ज काढलं-शालिनीताई पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

ADVERTISEMENT

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव हा बेकायदेशीर झाला अशी मागणी आमची दहा वर्षापासून आज देखील आहे असं आता शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. शालिनीताई पाटील यांनी ही प्रतिक्रिया त्याच दिवशी दिली आहे ज्यादिवशी ईडीने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

आणखी काय म्हणाल्या शालिनीताई पाटील?

हे वाचलं का?

सत्यमेव जयते यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि खऱ्या अर्थाने आमची पहिली लढाई यशस्वी ठरली अशा प्रतिक्रिया कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार व जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. हा कारखाना खासगी तत्त्वावर काढून शेतकरी सभासदांच्या मालकीचा करावा व तो शेतकऱ्यांना कारखाना कारखाना परत  मिळावा अशी मागणी देखील आजच्या कारवाईनंतर शालिनीताई पाटील यांनी केली आहे,  मे. गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि. ऊर्फ बीव्हीजी ऊर्फ जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. यांनी कारखान्याच्या जमिनी गहाण ठेवून ४०० कोटी रुपये कर्ज काढलेले आहे,’ असा गौप्यस्फोट जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका  डॉ. शालिनीताई पाटील यांनी या कारवाईनंतर पुन्हा एकदा आरोप केला आहे केला.

बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश शिंदे व धर्माधिकारी यांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ हे कलम 88 नुसार दोषी असून, शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर ईडीकडे फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आमची यापूर्वी मागणी होती त्या मागणीला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आज खऱ्या अर्थानं जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस असेल असेच मला प्रतिक्रिया द्याव्याशा वाटत आहेत

ADVERTISEMENT

शालिनीताई पाटील म्हणाल्या, ‘ यापूर्वी ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन जाॅईंट डायरेक्टर यांच्याकडे एफआयआर दाखल केला होता. त्या ऑफिसमध्ये परिस्थिती नाॅर्मल होती आणि एफआयआर दाखल केल्यापासून दोन दिवसांत चौकशी सुरू झाली. त्याचा  खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात याची देही याची डोळा  मला रिझल्ट पहावयास मिळाला.  काही वर्षांपूर्वी  आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. बरीच माहिती, कागदपत्रे पाहून घेतले; परंतु काही दिवसांनंतर चौकशीचे काम बंद दिसल्याने २२ जानेवारी २०२० रोजी पूरक एफआयआर दाखल करण्यासाठी ईडीच्या ऑफिसमध्ये गेले.

ADVERTISEMENT

त्यावेळी त्यांना सांगितले की, दहा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी लिलाव घेतला तेव्हा फक्त 18 कोटी किंमत बँकेमध्ये भरलेली आहे आणि खरेदीखतही तेवढ्याच रकमेचे आहे. त्याच प्राॅपर्टीवर 400 कोटी रुपये कर्ज काढले. ही जबाबदारी मी घेणार नाही आणि जर कारखाना परत मिळाला तर तो कर्जमुक्त असला पाहिजे. त्यासाठी आग्रह आहे. त्यावेळी जाॅईंट डायरेक्टरनी सांगितले की, ‘तुमची केस माझ्याकडून काढून घेतलेली आहे. ज्यांची चौकशी करायची ती व्यक्ती राज्याची उपमुख्यमंत्री असल्याने या परिस्थितीचा अंदाज आला आणि आम्ही कारखान्याच्या लिलावाची चौकशी ‘सीबीआय’नेच करावी, अशी मागणी केली होती त्यामुळेच सत्यमेव जयते ची सूत्रे हलली आणि सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने न्याय आता मिळणार असा विश्वास शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला. त्यावेळी लिलाव झालेल्या 50 कारखान्यांबाबत आता होणारी चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी म्हणून  मागणी आम्ही केली आहे आणि त्या मागणीला सत्य स्वरूप प्राप्त झाले

सभासदांचे दहा कोटी शेअर भांडवल शिखर बँकेत

आज आमच्याकडे कारखाना नसला तरी आमच्या संस्थेचे बाकीचे कामकाज आहे. कारखान्याची 225 एकर जमीन व पाणी पुरवठा योजना अशी कितीतरी कोटींची मालमत्ता आजही आहे. जरंडेश्वरच्या सभासदांचे दहा कोटी शेअर भांडवल शिखर बँकेत जमा आहे, असेही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT