जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, भाजपला धक्का
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. भाजपसाठी हा धक्का मानला जातो आहे. शिवसेनेने जळगाव महापालिकेत आवश्यक असलेली ३८ ही मॅजिकल फिगर क्रॉस करून बाजी मारली आहे. महापालिकेच्या सतरा मजली इमारतीवर आता पुन्हा भगवा फडकणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णयाक आघाडी घेतली. […]
ADVERTISEMENT
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. भाजपसाठी हा धक्का मानला जातो आहे. शिवसेनेने जळगाव महापालिकेत आवश्यक असलेली ३८ ही मॅजिकल फिगर क्रॉस करून बाजी मारली आहे. महापालिकेच्या सतरा मजली इमारतीवर आता पुन्हा भगवा फडकणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णयाक आघाडी घेतली. जळगाव महापालिकेत सत्तेसाठी ३८ ही संख्या होती. यात शिवसेनेने ४५ तर भाजपने ३० मतं मिळवली आहेत.
ADVERTISEMENT
अडीच वर्षांपूर्वी जळगाव महानगपालिकेत 75 पैकी ५७ जागा मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आज १८ मार्च रोजी नव्याने महापौर निवड असल्याने चार दिवस आधीच शिवसेनेच्या १५ नागरसेवकांनी भाजपच्या २७ नाराज नगरसेवकासोबत हात मिळवणी करत व MIM चे तीन असे ४५ नगरसेवकांची मिळून आज शिवसेने च्या जयश्री महाजन यांची ऑनलाइन मतदान करत निवड केली. जळगाव शहरात गेल्या अडीच वर्षा पासून भाजपाची सत्ता होती पण शहराचा विकास झाला नाही. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे कुठेतरी शिवेसेनेला साथ दिली तर विकास होईल या उद्देशाने भाजपचे ३० नगरसेवक आमचे सोबत आले असं जयश्री महाजन यांनी म्हटलं आहे.
महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला आज सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. सुरूवातीपासून निवड प्रक्रिया हा वादाचा मुद्दा ठरला कारण महापौर-उपमहापौर यांच्या अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन घेऊ नये असाही आक्षेप भाजपने घेतला होता. मात्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.
हे वाचलं का?
शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करून महापौरपदी आपले नाव निश्चित केलं. जयश्री महाजन यांना ४५ तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि MIM च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT