Parvez Musharraf : कारगिल युद्ध, शरीफांच्या सत्तेला सुरुंग; अशी आहे मुशर्रफांची कहाणी
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ (Pakistan Ex President Pervez Mushrraf) यांचे दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले (Passed Away). मुशर्रफ यांना हृदय आणि वयाशी संबंधित इतर अनेक आरोग्य समस्या होत्या. 1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनीच तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Ex Prime minister nawaj sharif) यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध (Kargil War) सुरू केले होते. […]
ADVERTISEMENT

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ (Pakistan Ex President Pervez Mushrraf) यांचे दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले (Passed Away). मुशर्रफ यांना हृदय आणि वयाशी संबंधित इतर अनेक आरोग्य समस्या होत्या. 1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनीच तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Ex Prime minister nawaj sharif) यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध (Kargil War) सुरू केले होते. लष्करप्रमुख असताना त्यांनी सत्तापालट करून पाकिस्तानात मार्शल लॉ जाहीर केला होता. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी झाला. ते पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख राहिले आहेत. परवेझ मुशर्रफ हे एक नाव आहे ज्यांनी पाकिस्तानच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकूया. story Of Pakistan’s Ex President Pervez Musharraf
नवाझ शरीफ यांनी बनवलं होतं लष्कर प्रमुख
1997 मध्ये जेव्हा नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. पंतप्रधान झाल्यानंतर नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनवले. लष्करप्रमुख म्हणून परवेझ मुशर्रफ हळूहळू शक्तिशाली झाले आणि त्यांचा सरकारमधील प्रभाव वाढला.
कारगिल युद्धाची सुरुवात
कारगिल युद्धासाठी जनरल परवेझ मुशर्रफ यांना जबाबदार मानलं जातं. कारगिल युद्धाच्या वेळी ते पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता कारगिल युद्ध सुरू केले.
1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी बंड करून नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवले. नवाझ शरीफ यांना याची आधीच कल्पना होती, त्यामुळे त्यांनी आधीच संशयाच्या आधारे मुशर्रफ यांना लष्करप्रमुख पदावरून हटवले होते. पण त्यांच्यानंतर मुशर्रफ यांच्या जागी लष्करप्रमुख बनलेले जनरल अझीझ हे मुशर्रफ यांचे निष्ठावंत निघाले. यानंतर नवाझ शरीफ यांची उचलबांगडी झाली.










