Kitchen Sink : सिंक पाईप साफ करणं कठीण वाटतं? फॉलो करा ‘या’ टिप्स
स्वच्छ स्वयंपाकघर केवळ छान दिसत नाही, तर आपल्याला अनेक रोगराईपासून दूर ठेवतं. स्वयंपाकघराची साफसफाई करताना आपण सिंक साफ करतो. पण, सिंकचा पाईप कधी आतून साफ करता का? सिंकच्या पाईपमध्ये खरकट्या अन्नामुळे खूप घाण आणि चिकटपणा जमा होतो, ज्यामुळे त्याची दुर्गंधी स्वयंपाकघरातही पसरते. यामुळे, अस्वच्छ सिंक पाईप्स सहज कशा स्वच्छ करता येतील याच्या सोप्या टिप्स जाणून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
स्वच्छ स्वयंपाकघर केवळ छान दिसत नाही, तर आपल्याला अनेक रोगराईपासून दूर ठेवतं.
हे वाचलं का?
स्वयंपाकघराची साफसफाई करताना आपण सिंक साफ करतो. पण, सिंकचा पाईप कधी आतून साफ करता का?
ADVERTISEMENT
सिंकच्या पाईपमध्ये खरकट्या अन्नामुळे खूप घाण आणि चिकटपणा जमा होतो, ज्यामुळे त्याची दुर्गंधी स्वयंपाकघरातही पसरते.
ADVERTISEMENT
यामुळे, अस्वच्छ सिंक पाईप्स सहज कशा स्वच्छ करता येतील याच्या सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
स्वयंपाकघरातील सिंकचा पाईप साफ करण्यासाठी, आधी तो बाहेर काढून मोकळ्या जागी स्वच्छ करा जेणेकरून त्याचा वास किचनमध्ये पसरणार नाही.
एका भांड्यात गरम पाणी उकळा, नंतर डिशवॉश द्रव घाला आणि त्यात 2-3 लिंबू पिळून घ्या. हे पाणी पाईपच्या आत टाका.
एका लांब काठीला ब्रश किंवा स्क्रबर बांधा आणि पाईप आतून घासून घ्या.
सिंकमध्ये पाईप लावल्यावर, नेहमी भांडी धुतल्यानंतर प्रेशरने पाणी ओता म्हणजे घाण निघून जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT