लडाखमध्ये मोठा अपघात, २६ जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत पडून ७ जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लडाखमध्ये २६ जवान बसलेल्या बसला मोठा अपघात झाला आहे. ही बस नदीत कोसळून अपघात झाला आहे. या घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने सगळ्यांना सोडवलं गेलं होतं मात्र या घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला. तसंच काही जवानांना गंभीर जखमाही झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

थोइस या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर ही घटना घडली. लष्कराची बस श्योक नदीत कोसळली. ही बस ५० ते ६० खोल बुडाली. त्यामुळे लष्कराचे जवान जखमी झाले. या घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला. सगळ्या जवानांना परतापूरच्या ४०३ फिल्ड रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. त्यानंतर लेहहून सर्जिकल टीम परतापूर या ठिकाणी पाठवण्यात आली. या घटनेत सात जवान शहीद झाले आहेत.

हे वाचलं का?

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांना सर्वोत्तम उपचार यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमींना वेस्टर्नना कमांडमध्ये हलवलं गेलं आहे. शुक्रवारी २६ जवानांना घेऊन बस परतापूरच्या शिबिरातून बस हनिफच्या पुढच्या ठिकाणी ही बस चालली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. रस्त्यापासून नदीची खोली ५० ते ६० फूट आहे. त्यामुळे या बसमध्ये बसलेले सगळे जवान जखमी झाले. यापैकी सात जवानांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT