सोशल मीडियावर #Banlipstick ट्रेंडमध्ये; प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीतने शेअर केले व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडियावर सध्या मराठी अभिनेत्रींनी सुरु केलेला #Banlipstick हा ट्रेंड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, सोनाली खरे या सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींनी आपला एक व्हिडीओ तयार करत सर्वांची उत्सुकता वाढवली आहे.

ADVERTISEMENT

या व्हिडीओंमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक!’ अशी कॅप्शन देत #BanLipstick हा हॅशटॅग वापरला आहे. दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील #BanLipstick हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन लिहिली आहे,”मला लिपस्टिकचा रंग नको…मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!”.

अभिनेत्री सोनाली खरेनेदेखील लिपस्टिक पुसतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले आहे,”माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक”. प्रत्येक अभिनेत्रीने व्हिडीओच्या शेवटी आपली लिपस्टीक स्वतःच्या हाताने पुसून टाकली आहे.

हे वाचलं का?

मराठी अभिनेत्रींच्या या कँपेनमुळे त्यांचे चाहतेच नाही तर कलाकारदेखील गोंधळून गेले आहेत. तेजस्वीनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंट केली आहे, “क्या हुआ भाई”.

सोशल मीडियावर चाहत्यांनी हे व्हिडीओ म्हणजे एखादा चित्रपट किंवा नाटकासाठीचं प्रमोशन असणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे? या रहस्यावरचा पडदा कधी उठणार याची चाहते वाट पाहत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT