कोरोनाशी लढा : लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ७ लाखांची मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र सरकारला आता प्रत्येक स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ७ लाखांची मदत केली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकरांचे आभार मानले आहेत.

ADVERTISEMENT

नाव न घेता उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. अनेक शहरातील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुटवडा, बेड्स न मिळणं अशी आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अनेक भागांमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत असून ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे अशा भागांत कोविड सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

‘Vaccines मोदी सरकारने विदेशात पाठवल्या नसत्या तर आज तुटवडा भासला नसता’

कोरोनाविरुद्ध लढ्यात राज्य सरकारला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी लता मंगेशकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मदत जाहीर केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता मदतनिधीला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांमध्ये लसींचे डोस ज्या प्रमाणात प्राप्त होतील त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व पात्र नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी महापालिकेने आवश्यक ते नियोजन केलं आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये. तसंच लस घेण्यासाठी येताना आणि केंद्रावर आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असंही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतल्या कोणत्या पाच केंद्रांवर आज उपलब्ध होणार लस?

नायर सर्वोपचार रूग्णालय – मुंबई सेंट्रल

सेठ छत्रभुज गांधी व मोनाजी अमिदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय- घाटकोपर

डॉ. रूस्तम नरसी कूपर रूग्णालय – जुहू, विलेपार्ले

सेव्हन हिल्स रूग्णालय-अंधेरी

वांद्रे-कुर्ला संकुल जंबो कोव्हिड सेंटर

‘महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू व्हावं ही मुख्यमंत्र्यांची इच्छा..’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT