Taliye Landslide : महाडच्या तळये गावातली दरड दुर्घटना, आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू
महाडच्या तळये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या तळई गावात दरड कोसळली. या घटनेत ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. आत्तापर्यंत 34 मृतदेह या ठिकाणाहून आणि चार मृतदेह त्या शेजारील ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने काही वर्षांपूर्वी झालेल्या माळीण गावातील […]
ADVERTISEMENT
महाडच्या तळये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या तळई गावात दरड कोसळली. या घटनेत ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. आत्तापर्यंत 34 मृतदेह या ठिकाणाहून आणि चार मृतदेह त्या शेजारील ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने काही वर्षांपूर्वी झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेच्या दुर्दैवी आठवणी ताज्या केल्या आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 35 लोक अडकल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढूही शकते अशीही भीती व्यक्त होते आहे.
ADVERTISEMENT
34 मृतदेह हे तळये गावातून तर इतर चार मृतदेह साखरससुतारवाडी गावातून मिळाले आहेत. NDRF ची टीम नुकतीच त्या ठिकाणी पोहचली आहे. दोन्ही ठिकाणाहून 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. आत्तापर्यंत महाडला NDRF च्या दोन टीम, कोस्ट गार्डच्या दोन टीम, SDRF 2 टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या बारा टीम महाडमध्ये पोहचल्या आहेत. सावित्री नदी दुथडी भरून वाहते आहे. या ठिकाणी राहणाऱ्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी NDRF ने बचाव कार्य सुरू केलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. महाडाची पाणी पातळी थोडी कमी झाली आहे असंही त्यांनी सांगतिलं आहे. सावित्री नदीजवळच्या गावात एकही नागरिक नाही. सर्व नागरिकांना विनंती आहे की जिथे आहात तिथे सुरक्षित थांबावं. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनेही बचावकार्य सुरू आहे. ज्या रस्त्यांवर दगड कोसळले आहेत ते दगडही काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे निधी चौधरी यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
महाडमधील बिरवाडीपासून 14 किमीपासून तळई गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अचानक दरड कोसळून तब्बल 30 हून अधिक घरं ही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं समजतं आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत यात काही जीवितहानी झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नव्हती. आता मात्र या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
दुसरीकडे महाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बिरवाडी आणि दुर्घटनाग्रस्त भागाशी संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. ही दुर्घटना होऊन आता अनेक तास उलटले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अद्यापही दुर्घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहचू शकलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT