पती-पत्नी शारीरिक संबंधाचे करायचे Live स्ट्रिमिंग, लाखो लोक पाहायचे अन् उधळायचे तुफान पैसे!

मुंबई तक

Couple Live Streamed: हैदराबादमधील एक जोडपे चेहऱ्यावर मास्क लावून चक्क त्यांच्या शारीरिक संबंधाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत असल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

पती-पत्नी शारीरिक संबंधाचे करायचे Live स्ट्रिमिंग
पती-पत्नी शारीरिक संबंधाचे करायचे Live स्ट्रिमिंग
social share
google news

Couple Live Streamed: एक विवाहित जोडपं मास्क घालून लैंगिक संबंधाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत असल्याचं विचित्र प्रकरण हैदराबादमध्ये समोर आलं आहे. हे जोडपं जे अश्लील लाइव्ह स्ट्रिमिंग करायचे ते लाखो लोक लाईव्ह पाहायचे. इतकंच नव्हे तर लोक या पती-पत्नीवर तब्बल हजारो रुपये खर्च करायचे. दरम्यान, आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, हे प्रकरण हैदराबादमधील आहे. येथे एक 41 वर्षीय पती आणि त्याची 37 वर्षीय पत्नी चेहऱ्यावर मास्क घालून त्यांच्या शारीरिक संबंधांचे थेट लाईव्ह स्ट्रीमिंग करायचे. लाईव्ह स्ट्रीमिंग हे मोबाइल अॅपवर केले जात होते आणि हे करण्याचे कारण जलद पैसे कमवणे होते.

हे ही वाचा>> मुलीच्या पोटात दुखायला लागलं अन् बापाचं घाणेरडं कृत्य समोर आलं, आईलाही माहिती होतं पण...

घरातून सापडल्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी

हैदराबादमधील अंबरपेट परिसरातील मलिकार्जुन नगरमधील एका फ्लॅटमध्ये हे जोडपे अश्लील कृत्य करत होते. याचवेळी पोलिसांनी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान, जोडप्याच्या घरातून हाय डेफिनेशन कॅमेरे, ट्रायपॉड आणि रिंग लाईट आणि काही आक्षेपार्ह उपकरणे सापडली आहेत.

मास्क घालून शारीरिक संबंधांचे लाइव्ह स्ट्रिमिंग

पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नी त्यांच्या शारीरिक संबंधाचे लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ अॅपवर विकत असत. या गोष्टी विशेषतः तरुणांसोबत शेअर केल्या जात होत्या. लोक अशा अश्लील कंटेंटसाठी पैसेही देत असत. ज्यामध्ये 2000 रुपयांत लाइव्ह व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग क्लिप 500 रुपयांना विकली जात असे. या बेकायदेशीर व्यवसायातून हे जोडपे खूप कमाई करत होते. तसेच, त्यांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी मास्क घातले होते.

हे ही वाचा>> हनिमून झाला अन् पत्नी प्रेमाने म्हणाली, 'अहो तुम्ही झोपा...' नव्या नवरीने केला भलताच कांड

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अजूनही सुरू आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी किती लोक सामील असू शकतात हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच, हे जोडपे किती काळापासून हे कृत्य करत होते याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp