खळबळजनक! क्रिकेटचा वाद टोकाला पोहचला... विद्यार्थ्याने शाळेतच केले चाकूने वार अन्...
आहिल्यानगरमधील एका शाळेत मधल्या सुट्टीत एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केला आणि त्याची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आठवीच्या विद्यार्थ्याने केली दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

क्रिकेटच्या वादामुळे चाकूने वार करुन हत्या

अहिल्यानगरमध्ये उडाली खळबळ
Ahilyanagar Crime: आहिल्यानगरमधील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरच हादरलं आहे. शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याने त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याचा खून केल्याची बातमी समोर आली आहे. शाळेत मधल्या सुट्टीत एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केला आणि त्याची हत्या केली. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.
क्रिकेटच्या वादातून हत्या
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा या विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील आरोपी आणि मृत पावलेला मुलगा शहरातील एकाच भागात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांमध्ये क्रिकेटवरुन वाद झाला आणि त्याच रागात शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा खून केला.
शाळेच्या मधल्या सुट्टीत घडली घटना
शाळेतील मधल्या सुट्टीत आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याच्या डोके आणि पोटावर चाकूने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं कळालं.
हे ही वाचा: 6 वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले, दाताने धरून फरफटत नेलं, थरकाप उडवणारा CCTV
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलं. या प्रकरणातील मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.