थेट गँगस्टरच्या आईला केलं ठार, गोळ्या झाडल्या अन्.. कोण आहे 'हा' गँगस्टर जग्गू?
Jaggu Bhagwanpuria mother murder: पंजाबमधील कुप्रसिद्ध गँगस्टर जग्गू भगवानपुरिया याच्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. जाणून घ्या गँगस्टर जग्गू भगवानपुरिया आहे तरी कोण.
ADVERTISEMENT

अमृतसर: पंजाबमधील बटाला येथे काल (26 जून) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. भर रस्त्यात एका कारवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एक तरुण आणि कारमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बाटाला येथील कादियन रोडवर, अज्ञात हल्लेखोरांनी एका स्कॉर्पिओवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये कारमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत बसलेली वयस्कर महिला ही गंभीर जखमी झालेली. तिला जखमी अवस्थेत अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.ॉ
जग्गू भगवानपुरियाच्या आईची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, बटाला येथील गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव हरजीत कौर असल्याचे समजते आहे. ती पंजाबमधील कुख्यात गुंड जग्गू भगवानपुरियाची आई होती. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा गँगस्टर जग्गूचं नाव चर्चेत आलं आहे. कधीकाळी कबड्डीसाठी ओळखला जाणारा जग्गू हा आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कुप्रसिद्ध आहे.
हे ही वाचा>> प्रेमात वेडीपिशी झाली..तरुणीला शोधत होते 11 राज्याचे पोलीस! अहमदाबाद प्लेन क्रॅशचं कनेक्शन आलं समोर
कोण आहे गँगस्टर जग्गू भगवानपुरिया?
गँगस्टर जग्गू भगवानपुरिया आता लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर विरोधक बनला आहे. तो पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील भगवानपूर गावचा रहिवासी आहे. एक काळ असा होता जेव्हा तो एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू मानला जात असे, परंतु कालांतराने त्याचा गुन्हेगारीच्या जगात प्रवेश झाला.
तो 2015 पासून तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, खंडणी, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि ड्रग्ज तस्करी असे 128 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो पंजाबमध्ये 'रिकव्हरी किंग' म्हणून देखील कुप्रसिद्ध आहे. त्याच्यावर कॅनडामध्येही खून केल्याचा आरोप आहे.