सांगलीत खळबळ! पतीने कसलाही विचार न करता पत्नीच्या डोक्यात बांबूनं केला हल्ला अन्...
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात घडली आहे. सांगली जिल्ह्यातील 30 वर्षीय महिलेवर तिच्याच पतीने हल्ला करत हत्या केली आहे. पिंटू पाटील असे पतीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सांगली जिल्ह्यातील 30 वर्षीय महिलेची पतीकडून हत्या

जोडप्यांना दोन मुलं असल्याची माहिती समोर आली
Sangli Crime News : कैटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. याची अनेक कारणं समोर येऊ लागली आहेत. अशीच एक घटना आता सांगली जिल्ह्यात घडली आहे. सांगली जिल्ह्यातील 30 वर्षीय महिलेवर तिच्याच पतीने हल्ला करत हत्या केली आहे. पिंटू पाटील असे पतीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने रागाच्या भरात पीडित महिला शिलवंती पाटीलच्या डोक्यात बाबूने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. हत्येनंतर तो त्यांच्या दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून पळून गेला आहे. या घटनेनं सांगलीत हळहळ व्यक्त केली जाते.
हेही वाचा : Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडणार?
या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत घटनेचा तपास करत माहिती दिली, पिंटू हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावातील रहिवासी आहे. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या काही वर्षांपासून सांगलीतच वास्तव्यास असून मजूर म्हणून कार्यरत होता. शिलवंती आणि पिंटू यांच्या विवाहानंतर ते सांगलीत हनुमाननगर येथे राहण्यास गेले. दरम्यान, या जोडप्यांना दोन मुलं असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नेमकं घडलंय काय?
सांगलीतील विजयनगरजवळील असणाऱ्या राजश्री शाहुनगर येथील बंगल्यात बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या पाहणीसाठी पिंटू आणि शिलवंती तिथं राहून काम करू लागले होते. शिलवंती तिथे वॉटर पंप म्हणून काम करू लागली. तर पिंटू हा मजूर म्हणून काम करू लागला होता.
दरम्यान अहवालानुसार, गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यांमध्ये वारंवार किरकोळा कारणांवरून सतत वाद व्हायचे. या वादांमुळे दोघांमध्ये अनेकता तेढ निर्माण होऊ लागला. त्यानंतर मग शिलवंती ही 13 जून रोजी आपलं घर सोडून गेली. त्यानंतर पिंटूनं संजयनगर पोलीस ठाण्यात शिलवंतीच्या बेपत्तेबाबत तक्रार दाखल केली होती. यानंतर शिलवंतीच्या पुण्याजवळ तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. ती शनिवारी घरी परतली, परंतु दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाले. दरम्यान, नंतर शिलवंती पुन्हा घरी आली मात्र, याची माहिती पोलिसांना कळवली नाही.