Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडणार?
Mumbai Weather Today: 27 जून 2025 रोजी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरात पावसाचा जोर कायम राहील, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.
ADVERTISEMENT

Mumbai Weather IMD Alert: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्र (MMRDA) परिसरात आज (27 जून) रोजी पावसाच जोर वाढू शकतो. या कालावधीत मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, आणि इतर उपनगरीय भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे.
हवामानाचा अंदाज:
27 जून रोजी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. तसंच सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी बरसतील. दुपारनंतर मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Haldi in Water Trend: हळद पाण्यात टाकण्याचा भलताच ट्रेंड, अचानक कसा सुरू झाला?
नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, आणि घणसोली तसेच मुंबईतील पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, आणि मुलुंड या भागांमध्ये पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे.
भरती-ओहोटी:
भरती:
सकाळी 01:30 वाजता (अंदाजे 4.10 मीटर)
दुपारी 01:40 वाजता (अंदाजे 4.80 मीटर)