Haldi in Water Trend: हळद पाण्यात टाकण्याचा भलताच ट्रेंड, अचानक कसा सुरू झाला?
मोबाइलच्या फ्लॅश लाइटमध्ये काचेचा पाण्याचा ग्लास ठेवून त्यात हळद टाकून त्याचा व्हिडिओ शेअर करण्याचा नवा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घ्या याचविषयी.
ADVERTISEMENT

मुंबई: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एक वेगळाचा ट्रेंड व्हायरल होत आहे. तो म्हणजे हळद पाण्यात टाकण्याचा ट्रेंड. या ट्रेंडचे सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये लोक अंधारात किंवा एक ग्लास पाण्यात हळद टाकून त्याचे स्लो-मोशन व्हिडिओ किंवा रिल्स बनवत आहेत. हे व्हिडिओ अनेकदा म्युझिक ट्रॅकसह किंवा गाण्यांच्या पार्श्वसंगीतासह अपलोड केले जात आहे. पण हा ट्रेंड का आणि कशासाठी सुरू झाला याबाबत कोणालाही अद्याप अंदाज लावता आलेला नाही.
ट्रेंडचे स्वरूप आणि लोकप्रियता
या ट्रेंडमध्ये सहभागी होणारे लोक सामान्यतः एक ग्लास पाण्यात चिमूटभर किंवा त्याहून अधिक हळद टाकतात आणि त्याचे मिश्रण करताना त्याचा व्हिडिओ शूट करतात. काहीजण याला "इम्यूनिटी बूस्टर" किंवा "डिटॉक्स ड्रिंक" म्हणून प्रचार करत आहेत. तर काहीजण याला फक्त मजेदार आणि सौंदर्यपूर्ण रील्स बनवण्याचा भाग मानतात.
हे ही वाचा>> Parada ने लॉन्च केली 1 लाखांची 'कोल्हापुरी चप्पल', पण भारताला श्रेयच नाही...
सोशल मीडियावर हा ट्रेंड इतका व्हायरल झाला आहे की, अनेक सेलिब्रिटी, इन्फ्लूएन्सर्स आणि सामान्य लोकही अशा स्वरूपाचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सोशल मीडियावर अनेक विचित्र ट्रेंड पाहायला मिळतात. मात्र, हळद पाण्यात टाकण्याच्या या ट्रेंडची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
ज्योतिषींचा इशारा आणि वाद
हा ट्रेंड जितका लोकप्रिय झाला, तितकाच तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. काही ज्योतिषशास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, पाण्यात हळद टाकणे ही एक तांत्रिक क्रिया आहे, जी अज्ञानाने केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. त्यामुळे हा ट्रेंड फॉलो करणे धोकादायक ठरू शकते. आणि यामुळे घरातील सुख-शांती धोक्यात येऊ शकते. या दाव्यामुळे अनेक नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी या इशाऱ्याला गंभीरपणे घेतले, तर काहींनी याला अंधश्रद्धा म्हटलं आहे.