Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी सुवर्णसंधी! कसं आणि कधीपर्यंत कराल अप्लाय?

मुंबई तक

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीअंतर्गत एकूण 541 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

ADVERTISEMENT

सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी सुवर्णसंधी!
सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी सुवर्णसंधी!
google news

बातम्या हायलाइट

point

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून भरती जाहीर

point

SBI कडून ऑफिसर पदासाठी भरती

point

कसं आणि कधी कराल अप्लाय?

Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची जाहीरात समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीअंतर्गत एकूण 541 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. 

या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in/sbipomay25/ या रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. 

या भरतीच्या माध्यमातून एकूण प्रोबेशनरी पदाच्या एकूण 541 जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 500 पदे नियमित श्रेणीतील आहेत. तसेच, 41 पदे बॅकलॉग म्हणजेच मागील भरतींमधील रिक्त पदे भरण्यासाठी आहेत.

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (Graduation) ची डिग्री असणं आवश्यक आहे. 

हे वाचलं का?