Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आता लॉकडाउनशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता लॉकडाउन लावलं नाही तर येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असे सूचक संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ADVERTISEMENT

…तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार उदयनराजे

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातली वाढती रुग्णसंख्या पाहता आताच कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं बोलून दाखवलं, “आताच लॉकडाउन लावला तर परिस्थिती महिन्याभरात नियंत्रणात येईल. लॉकडाउनशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये. येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडणं गरजेचं आहे.” लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास लॉकडाउन लावण्याची हीच वेळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

हे वाचलं का?

पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन

सध्या होत असलेला विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॉकडाउन हाच एक योग्य पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत पुन्हा एकदा सांगितलं. त्यामुळे सर्वपक्षांनी एकमताने याबद्दल निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधल्या घटकपक्षांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांना आपला पाठींबा दर्शवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं सांगितलं. तसेच कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आताच कटू निर्णय घेण्याची वेळ आली आहे, हे निर्णय आताच घेतले तरच परिस्थितीवर नियंत्रण येऊ शकतं. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा असं थोरात म्हणाले. दरम्यान अशोक चव्हाण यांनीही लॉकडाउनला पाठींबा दर्शवत फक्त घोषणा करत असताना गरीबांचा विचार करुन मधला रस्ता काढावा अशी विनंती केली.

ADVERTISEMENT

दरम्यान राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र संपूर्ण लॉकडाउनला बैठकीत विरोध केला. राज्यातील रुग्णालयांमध्ये बेड्स कसे उपलब्ध होतील, रेमिडेविसीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड कसे उपलब्ध होतील याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं असं फडणवीस म्हणाले. लॉकडाउनचा निर्णय घेताना सरकारने लोकांच्या मनात असलेला रागही विचारात घ्यावा असं फडणवीस म्हणाले. यावेळी बोलत असताना फडणवीसांनी लसीच्या पुरवठ्यापासून सत्ताधारी पक्षातील मंत्री केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांचा मुद्दा काढला. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत…पण केंद्राकडे बोट दाखवलं तर मग आम्हालाही उत्तर द्यावं लागेल असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

वीजबीलांवरुन आजही लोकांच्या मनात रोष आहे. मागचं वर्ष लॉकडाउनमुळे संपूर्ण खराब केलं पण तरीही लोकांना लाईटची बिलं आली. लोकांनी जगायचं तरी कसं? राज्यावर कर्जाचा बोझा वाढतोय…वाढू द्या. व्यापारी संपत जात चालला आहे…संपू द्या अशी भूमिका घेऊन कसं चालेल. कोणताही विचार न करता लॉकडाउनचा निर्णय घेतला तर लोकांचा राग अनावर होईल असाही इशारा फडणवीस यांनी बैठकीत दिला. त्यामुळे राज्य सरकार आता लॉकडाउनसंदर्भात काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT