महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 187 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 859 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 30 हजार 137 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 859 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 30 हजार 137 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 91 लाख 72 हजार 531 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 41 हजार 759 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 35 हजार 516 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 837 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 74 हजार 483 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 63 लाख 61 हजार 759 इतकी झाली आहे.
मुंबईत 309 नवे रूग्ण
मुंबईत कोरोनाचे 309 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 407 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 14 हजार 166 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 97 टक्के इका झाला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 4345 सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट 1631 दिवसांवर गेला आहे.









