शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर महाराष्ट्रातील नेते प्रचंड संतापले!
मुंबई: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध […]
ADVERTISEMENT
मुंबई: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.
ADVERTISEMENT
हा राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला असल्याची टीका उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा, असा सल्ला देत निषेध करणारं ट्विट त्यांनी केलं आहे. तर संजय राऊत यांनी ‘उठ मराठ्या उठ’ म्हणत या घटनेचा धिक्कार केला आहे.
पाहा कर्नाटकमधील घटनेनंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी काय-काय दिल्या प्रतिक्रिया
हे वाचलं का?
शिवरायांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2021
अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार
ADVERTISEMENT
‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे.’
‘पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारनं याकडे गांभीर्यानं पहावं. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी,अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी,असं आवाहन आहे.’
‘छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2021
शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार – एकनाथ शिंदे
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे.’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून तर सकल हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे.’
‘या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असून तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र, आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत. बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील.’ असा इशाराच यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला.घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील pic.twitter.com/RnUhHjeeu2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2021
‘आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी’, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दुर्दैवी: गृहमंत्री वळसे-पाटील
‘बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दुर्दैवी असून मी उठ मराठ्या ऊठया घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो.’ असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दुर्दैवी असून मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) December 18, 2021
‘उठ मराठ्या ऊठ’, संजय राऊतांची मराठ्यांना हाक
‘दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.’
धिक्कार! धिक्कार!
उठ मराठ्या ऊठ!! असं म्हणत संजय राऊत यांनी याप्रकरणी आपला निषेध व्यक्त केला आहे.
बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
महाराष्ट्र भाजपनेही कर्नाटक सरकारकडे कारवाईची मागणी करावी: रोहित पवार
‘बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या समाजकंटकांच्या कृतीचा तीव्र निषेध! या घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारसह महाराष्ट्र भाजपनेही कर्नाटक सरकारकडे करावी.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिलीआहे.
बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या समजकंटकांच्या कृतीचा तीव्र निषेध! या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारसह @BJP4Maharashtra नेही कर्नाटक सरकारकडं करावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 18, 2021
…नाहीतर वणवा लागेल: निलेश राणे
‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी नाहीतर वणवा लागेल.’ असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी नाहीतर वणवा लागेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 18, 2021
यासारख्या अनेक प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून येत. याशिवाय महाराष्ट्रातील जनतेच्या देखील याबाबत अत्यंत तीव्र भावना आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT