Maharashtra Politics : आदित्य ठाकरे देसाईंचं आव्हान स्वीकारणार का?
Shambhuraj Desai challenge to Aaditya Thackeray। Maharashtra politics : शिवसेनेची दोन शकलं (Shiv Sena Splits) झाल्यापासून दोन्ही गटात सातत्यानं संघर्षांच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानंही देताहेत. आता युवा सेना प्रमुख (Yuva Sena Pramukh) आणि आमदार (MLA) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे […]
ADVERTISEMENT
Shambhuraj Desai challenge to Aaditya Thackeray। Maharashtra politics : शिवसेनेची दोन शकलं (Shiv Sena Splits) झाल्यापासून दोन्ही गटात सातत्यानं संघर्षांच्या ठिणग्या उडताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानंही देताहेत. आता युवा सेना प्रमुख (Yuva Sena Pramukh) आणि आमदार (MLA) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे गटाकडून (Shinde Faction) प्रतिवार करण्यात आला. इतकंच नाही, तर साताऱ्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj desai) यांनी त्यांना पाटणमधून जिंकून येण्याचं आव्हानं दिलं. (shambhuraj desai vs aaditya thackeray)
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना सातत्यानं लक्ष्य करताना दिसतात. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं. शिंदे गटाला लक्ष्य करताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावं.”
हे वाचलं का?
Shubhangi Patil म्हणाल्या, ‘मी शब्दाला पक्की असते’, अन् केला ‘या’ पक्षात प्रवेश
शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंना काय आव्हान दिलं?
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. आदित्य ठाकरेंवर टीका करताना देसाईंनी प्रतिआव्हानही दिलं.
ADVERTISEMENT
शंभूराज देसाई म्हणाले, “आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात. आता तर त्यांनी वरळी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं आहे. मुळात आदित्य ठाकरेंना निवडून यायला तेथील विद्यमान आमदार सुनील शिंदेंचं तिकिट कट करावं लागलं होतं. त्यावेळी सुनील शिंदेंना व सचिन अहिर या दिग्गजांना विधान परिषदेवर घ्यावं लागलं.”
ADVERTISEMENT
Uddhav ठाकरेंनी आपल्या आमदारांवर डोळे झाकून एवढा विश्वास का टाकला?
“एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं हास्यास्पद आहे. शिंदेसाहेब लांब राहू देत, आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणूक लावायची तयारी असेल, तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावं. ज्यांच्या मागे 50 आमदार व 13 खासदार आहेत त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये”, असं आव्हान देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.
आदित्य ठाकरे आव्हान स्वीकारणार का?
आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान देणारे शंभूराज देसाई हे शिंदे गटातील पहिले आमदार नाहीत. यापूर्वी कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरेंनी वरळीतून आमदारकीचा राजीनामा द्यावा, मी सिल्लोडमधून देतो आणि निवडणूक लढू, असं सत्तार म्हणाले होते.
सत्तारांनंतर आता शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटातून मिळालेलं हे आव्हान स्वीकारणार का? शंभूराज देसाईंना काय उत्तर देणार हे आगामी काळात दिसेलच.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT