रुग्णसंख्येचा आलेख घसरला! महाराष्ट्रात दिवसभरात आढळले १,९६६ रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर प्रथमच निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात १,९६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, ११,४०८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दरही ९७.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

ADVERTISEMENT

राज्यात आजपर्यंत ७६,६१,०७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत ७,६५,२७,८९५ नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७८,४४,९१५ म्हणजे १०.२५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असून, ८१५ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या ३६,४४७ सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन अपडेट

हे वाचलं का?

राज्यात दिवसभरात ८ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण मुंबईत आढळून आले असून, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेकडून नोंदवण्यात आले आहेत.

नवीन ८ रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ३,९९४ इतकी झाली आहे. यापैकी ३,३३४ रुग्ण बरे झाले असून, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी परतले आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात आतापर्यंत ८,८०४ नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यापैकी ७,५०७ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, १,२९७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईत १९२ रुग्णांची नोंद

मुंबईतही तिसरी लाट पूर्णपणे ओसरल्याची परिस्थिती आहे. मुंबईत आज फक्त १९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आढळून आलेल्या रुग्णांपैकी १६२ रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर २६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या २,५१३ इतकी असून, दिवसभरात ३५० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १६,६८५ वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात २८,५९९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी १६९१ दिवस इतका झाला असून, सध्या मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या शून्य झाली आहे. त्याचबरोबर सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्याही शून्यावर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT