हुश्श! महाराष्ट्राला मोठा दिलासा! दिवसभरात आढळले २८,२८६ रुग्ण, ३६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच राजधानी मुंबईपाठोपाठ आज राज्यालाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात प्रथमच रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात २८,२८६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ३६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात आज दिवसभरात २१,९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ७०,८९,९३६ इतकी झाली आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.०९ टक्के इतका असून, दिवसभरात राज्यात २८,२८६ नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं.

देशात ‘ओमिक्रॉन’च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात; मुंबईसह महानगरांमध्ये ठरतोय वरचढ

हे वाचलं का?

कोरोना बाधित ३६ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३५,११,८६१ नमुन्यांपैकी ७५,३५,५११ म्हणजेच १०.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून, ३,४०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Covid19: लस न घेणं जीवावर बेततंय… नव्या स्टडीत आली धक्कादायक माहिती समोर

ADVERTISEMENT

राज्यात दिवसभरात आढळले ८६ ओमिक्रॉन रुग्ण

ADVERTISEMENT

राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, दिवसभरात ८६ रुग्ण आढळून आले आहेत. यात नागपूरमध्ये ४७, पुणे मनपा २८, पिंपरी-चिंचवड मनपा ३, वर्ध्यात २ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा, पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी १ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनचा बाधित रुग्णांची संख्या २,८४५ वर पोहोचली आहे.

ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये सर्वाधिक दिसतात ‘ही’ दोन लक्षणं, दुर्लक्ष मुळीच नको

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन बाधित रुग्ण?

मुंबई महापालिका – 1010

ठाणे जिल्हा – 00

ठाणे महापालिका – 51

नवी मुंबई महापालिका – 13

कल्याण डोंबिवली महापालिका – 11

उल्हासनगर महापालिका – 03

भिंवडी निजामपूर महापालिका – 05

मीरा भाईंदर महापालिका – 52

पालघर जिल्हा – 00

वसई विरार महापालिका – 07

रायगड जिल्हा – 02

पनवेल महापालिका – 18

नाशिक जिल्हा – 05

नाशिक महापालिका – 00

मालेगाव महापालिका – 00

अहमदनगर जिल्हा – 04

अहमदनगर महापालिका – 00

धुळे जिल्हा – 00

धुळे महापालिका – 00

जळगाव जिल्हा – 02

जळगाव महापालिका – 00

नंदूरबार जिल्हा – 02

पुणे जिल्हा – 62

पुणे महापालिका – 1,030

पिंपरी चिंचवड महापालिका – 121

सोलापूर जिल्हा – 10

सोलापूर महापालिका – 00

सातारा जिल्हा – 15

कोल्हापूर जिल्हा – 19

कोल्हापूर महापालिका – 00

सांगली जिल्हा – 59

सांगली मिरज कुपवाड महापालिका – 00

सिंधुदुर्ग जिल्हा – 00

रत्नागिरी जिल्हा – 00

औरंगाबाद जिल्हा – 20

औरंगाबाद महापालिका – 00

जालना जिल्हा – 03

हिंगोली जिल्हा – 00

परभणी जिल्हा – 03

परभणी महापालिका – 00

लातूर जिल्हा – 03

लातूर महापालिका – 00

उस्मानाबाद जिल्हा – 11

बीड जिल्हा – 01

नांदेड जिल्हा – 03

नांदेड महापालिका – 00

अकोला जिल्हा – 11

अकोला महापालिका – 00

अमरावती जिल्हा – 32

अमरावती महापालिका – 00

यवतमाळ जिल्हा – 01

बुलढाणा जिल्हा – 06

वाशिम जिल्हा – 00

नागपूर जिल्हा – 225

नागपूर महापालिका – 00

वर्धा जिल्हा – 15

भंडारा जिल्हा – 03

गोंदिया जिल्हा – 03

चंद्रपूर जिल्हा – 00

चंद्रपूर महापालिका – 00

गडचिरोली जिल्हा – 02

बाहेरील राज्यांतील – 01

राज्यातील एकूण रुग्ण – 2,845

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT