ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत एक माणूस एका महिलेचं मुंडकं हातात घेऊन फिरतो आहे. क्रूरपणे हसतो आहे हे दिसतं आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नाही. हत्या केलेल्या महिलेचा तो पती आहे. पत्नीच्या व्याभिचाराची माहिती मिळाली त्यामुळे त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये आलेल्या वृत्तानुसार ही घटना इराणमधली आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव मोना हैदरी असं आहे. या महिलेचं वय 17 वर्षांचं होतं. तिच्यामध्ये आणि तिच्या पतीमध्ये 12 वर्षांचं अंतर होतं. साज्जाद हैदरी असं या व्हीडिओत दिसणाऱ्या आणि मोनाची हत्या करणाऱ्या माणसाचं नाव आहे. त्याला पत्नीचे म्हणजेच मोनाचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय आला त्यानंतर त्याने तिची गळा चिरून हत्या केली. एवढंच करून तो थांबला नाही तर तिचं मुंडकं हातात घेऊन तो रस्त्यावर मिरवत होता. तिची हत्या ज्या सुऱ्याने केली तो सुराही त्याच्या हातात होता.

हे वाचलं का?

मोना 12 वर्षांची होती तेव्हाच सज्जाद हैदरीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं. तिने सज्जाद तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करतो अशी तक्रारही केली होती असं इराणच्या वुमन कमिटीचं म्हणणं आहे. मागील तीन वर्षांपासून तो तिचा छळ करत होता. आता त्याने तिची हत्या केली. मोनाने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली घरातून तुर्कीला पळ काढला. मात्र तिथे राहणं तिला कठीण होऊन बसलं त्यामुळे ती इराणला परतली होती.

इराणला परतल्यानंतर सज्जाद आणि तिच्या भावाने तिला पकडलं. तिचे हात बांधले आणि तिचं शीर धडावेगळं केलं. तिला ठार केल्यानंतर तिचं शीर हातात घेऊन सज्जाद रस्त्यावर फिरला. यासंदर्भातला व्हीडिओ व्हायरल जाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सज्जादला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून मोनाची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

मोनाच्या हत्येप्रकरणी तिचा पती सज्जाद आणि त्याचा भाऊ या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मोना तुर्कीला पळून गेली तेव्हा तिने तिचे फोटो तिच्या पतीला पाठवले होते त्यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल राग आणि चिड निर्माण झाली. तर इराणच्या महिला समितीने म्हटलं आहे की ऑनर किलिंगच्या बातम्या आल्या नाहीत असा एकही आठवडा जात नाही. या प्रकारचे गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असंही महिला समितीने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT