रंगाचा बेरंग ! होळीदरम्यान पाण्याच्या फुग्यामुळे एकाचा मृत्यू, विरारमधील घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात आज सर्वच ठिकाणी धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. प्रत्येक जण रंगामध्ये स्वतःला रंगवून घेतो आहे. परंतू अनेकदा होळीचा सण साजरा करताना काही जण भान हरपतात, अशामुळे काहींना प्राण गमवावे लागतात. विरारमध्ये होळीच्या सणाला अशाच पद्धतीने गालबोल लागलं आहे. पाण्याच्या फुग्यामुळे विरार पश्चिम भागात एका सायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ADVERTISEMENT

विरार पश्चिमेच्या पुरापाडा चाळपेठ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत मृत पावलेल्या सायकलस्वाराचं नाव रामचंद्र पटेल असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील पुरापाडा भागातून रामचंद्र पटेल हे सायकलवरुन विरारच्या दिशेने निघाले होते. याचदरम्यान होळीसाठी लाकडं घेऊन जाणारा एक ट्रक या रस्त्याने जात होता. या ट्रकमधील तरुणांनी पाण्याचे फुगे बाईकस्वारावर फेकून मारले.

या फुग्यांमुळे बाईकस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि त्याची धडक सायकलवरुन जाणाऱ्या रामचंद्र पटेल यांना बसली. ज्यात पटेल यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलीसांनी रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेऊन बाईकस्वारालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. राज्य सरकारने होळीचा सण साजरा करताना पाण्याचे फुगे मारण्यास बंदी केली आहे. परंतू अजुनही काही मंडळी धुळवडीदरम्यान सर्रास फुगे मारताना दिसतात.

हे वाचलं का?

होळी हा सण आनंदाचा, आयुष्यात नवीन रंग भरण्याचा असला तरीही अशा घटनांमुळे एखाद्याच्या घरी दुःखाचं वातावरण तयार होतं. या घटनेमुळे विरार परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT