मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर; खांद्यावर उचलून जल्लोष अन् वाजतगाजत मिरवणूक
पुणे : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने चर्चेत आलेल्या मनोज गरबडे आणि त्याचा अन्य दोन साथीदारांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर होताच मनोज आणि त्याचे अन्य दोन साथीदार विजय होवाळ, आकाश इजद यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. दरम्यान, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या […]
ADVERTISEMENT

पुणे : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने चर्चेत आलेल्या मनोज गरबडे आणि त्याचा अन्य दोन साथीदारांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर होताच मनोज आणि त्याचे अन्य दोन साथीदार विजय होवाळ, आकाश इजद यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.
दरम्यान, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. या कार्यकर्त्यांनी गरबडे आणि अन्य दोघांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तसंच वाजगाजत मिरवणूकही काढण्यात आली. आज सकाळीच डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या सुकुमार कांबळे यांनी मनोज गरबडे आणि त्याचा साथीदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं होतं.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे वारकऱ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. पण शाळा सुरु करताना त्यांना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असं विधान केलं होतं.
पाटील यांच्या या विधानावर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. याच दरम्यान, त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली. चंद्राकांत पाटील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बंदोबस्तात असणाऱ्या १० पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.