चंद्रपुरात भीषण आग, 20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपो जळून खाक; 50 कोटींचे नुकसान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच आहे. जिल्हा व आसपासच्या अग्निशमन यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या करूनही आग धुमसणे जारीच आहे. रात्रभर ही आग विझविण्याचं काम सुरु होतं. पण अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही.

ADVERTISEMENT

20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपोची यात राख झाली आहे. 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग कमी झाल्यावर पहाटे या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. मात्र, साठा नसल्याने पंप 3 दिवसापासून बंद होता व त्यामुळे मोठी हानी टळली. प्रचंड आग-सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी वेळ लागतो आहे.

हे वाचलं का?

सकाळपासून अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाने लाकूड आगारात अग्निशमन यंत्रणा उभारताना अक्षम्य हलगर्जीपणा दाखविल्याने जिल्हा व आसपासच्या यंत्रणांना नाहक त्रास आणि आगीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

काल दुपारी लागलेली ही आग अजूनही अग्निशमन दल विझवत आहे, पेपर मिलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाकडून शेजारील जंगलातील झुडपे जाळण्यासाठी आग लावण्यास सुरुवात करण्यात आली होती. याच्याच बाजूला हा डेपो आहे. त्यातूनच ही आग लागली असल्याची शक्यता आहे. कळमना गावाजवळील राज्य महामार्गावर वाढत्या आगीचे भीषण रूप बघून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 8 तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

स्पा सेंटरला भीषण आग, एका महिलेसह दोन जणांचा होरपळून मृत्यू

ADVERTISEMENT

काल दुपारी लागलेली ही आग अजूनही अग्निशमन दल विझवत आहे, पेपर मिलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाकडून शेजारील जंगलातील झुडपे जाळण्यासाठी आग लावण्यास सुरुवात करण्यात आली होती. याच्याच बाजूला हा डेपो आहे. त्यातूनच ही आग लागली असल्याची शक्यता आहे. कळमना गावाजवळील राज्य महामार्गावर वाढत्या आगीचे भीषण रूप बघून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 8 तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

आगीच्या ज्वाळांमुळे रस्त्यावर उभे राहणेही अवघड झाले आहे. या आगीत जोपर्यंत संपूर्ण लाकडं जळाल्याशिवाय आग विझवता येणं कठीण आहे, या भीषण आगीमुळे पेपर मिल प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

एवढ्या मोठ्या लाकूड डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले आहे. पेपर मिलमध्ये या लाकडापासून कागद तयार केला जातो, आता येथील लाकडं जळून खाक झाल्याने कागदाच्या निर्मितीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

बल्लारपूरचे तहसीलदार संजय रायचनवार यांनी सांगितले की, ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळेच नजीकच्या कळमना गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT