Budget 2023: शिक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा
Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : गत महिन्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठा फटका बसताच शिंदे सरकारकडून (Shinde Government) शिक्षण सेवकांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीसांनी शिक्षणसेवकांच्या मानधनात […]
ADVERTISEMENT
Devendra fadnavis Maharashtra Budget Speech :
ADVERTISEMENT
मुंबई : गत महिन्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठा फटका बसताच शिंदे सरकारकडून (Shinde Government) शिक्षण सेवकांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीसांनी शिक्षणसेवकांच्या मानधनात तब्बल १० हजार रुपयांची भरघोस वाढ केली आहे. (Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget)
फडणवीस यांच्या या घोषणेनंतर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपये होणार आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये होणार आहे. शिवाय उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये होणार आहे.
हे वाचलं का?
कोण असतात शिक्षण सेवक?
2000 पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करुन शासन नियमानुसार वेतन दिले जाते. यापूर्वी शिक्षणसेवकांच्या मानधनात सप्टेंबर 2011 ला वाढ झाली होती.
त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना 6 हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना 8 हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना 9 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर मागील 12 वर्षांपासून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिक्षण सेवक यांच्याकडून होत होती. हेच शिक्षण सेवक भविष्यात विधान परिषदेसाठी मतदार होतात.
ADVERTISEMENT
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; फडणवीसांची मोठी घोषणा
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत बसला होता फटका :
गत महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. कोकण वगळता एकाही ठिकाणी भाजपला त्यांचा उमेदवार निवडून आणता आला नव्हता. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला होता. इथून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.
Maharashtra Budget 2023 Live: तिजोरी उघडली! फडणवीसांकडून घोषणांचा पाऊस
याशिवाय औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी नेते विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. इथून भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव झाला होता. अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या रणजीत पाटलांचा पराभव केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT