Sachin Vaze Case: ‘वर्षा’वर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, CMची ‘यांच्यासोबत’ 4 तास चर्चा

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: एकीकडे सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे. या सगळ्या प्रकरणी ठाकरे सरकार नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल (16 मार्च) रात्री एक बैठक घेतली. ज्यामध्ये तब्बल 4 तास खलबतं सुरु होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, डीजीपी हेमंत नागराळे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत 4 तासांहून अधिक चर्चा केली. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर पार पडली. मुख्यमंत्र्यांची ही बैठक काल रात्री 8 वाजता सुरु झाली होती. जी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास संपली.

दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढंच नव्हे तर या बैठकीनंतर गृहमंत्री किंवा दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियासमोर येऊन कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या बैठकीत निश्चितच काही तरी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Sachin Vaze प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही-शरद पवार

NIAच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता ही बैठक बोलावण्यात आली असल्याची दाट शक्यत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरु असलेली ही बैठक नक्कीच अत्यंत महत्त्वाची होती हे यावरुन स्पष्ट होतं.

ADVERTISEMENT

दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली जाणार का? याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप तरी कोणतीही बदली करणार असल्याची माहिती दिलेली नाही.

ADVERTISEMENT

दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला असून त्यामुळे मुंबई पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

NIA नुसार PPE KIT घातलेली ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच!

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की, तूर्तास तरी कुणाचीही बदली करण्यात येणार नाही. ‘मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरण असो कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जोपर्यंत कोणाच्याही विरोधात पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपल्या पदावर काम राहिल.’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या कारप्रकरणी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे. ज्यावेळी ही कार पार्क करण्यात आली तेव्हा सचिन वाझे देखील तिथे उपस्थित होते असा एनआयएचा दावा असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशावेळी आता या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मर्सिडीज गाडीत काय सापडलं? NIA ची पहिली प्रतिक्रिया, वाझेंच्या अडचणी वाढल्या

काय आहे सचिन वाझे प्रकरण?

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उठले. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात व्यावसायिक हितसंबंध असल्याची बाबही समोर आली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विविध आरोप करत सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे दाखवून दिले. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा मिळावी अशीही मागणी ५ मार्चला केली. त्याच दिवशी दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला.

यानंतर आणखी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे आणखी काही कागदपत्रे, सीडीआर यांचा हवाला देऊन विधानसभेत सांगितलं. हे संपूर्ण प्रकरण NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणीही केली. स्कॉर्पिओचं प्रकरण हे NIA कडे तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलं आहे. या दोन्ही तपास यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

१३ मार्चच्या रात्री NIA ने सचिन वाझेंना अटक केली. या अटकेनंतर विविध तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली केली जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशा चर्चा रंगल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT