आमच्या शेपटाला आग लावाल तर तुमची लंका जाळू – उत्तर सभेत संदीप देशपांडे कडाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा आला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीका केली. ज्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता.

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या उत्तर सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मुंब्र्याची म्हैस मनसेविरुद्ध बोलली. अफजलगुरूला फाशी देऊ नये म्हणत रडणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही रामचंद्रांचे सैनिक आमच्या शेपटीला आग लावू नका. आम्ही तुमची लंका जाळल्या शिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी आव्हाडांवर थेट नाव न घेता टीका केली.

मनसेच्या ‘उत्तरसभेत’ वसंत मोरेंनी भोंग्याचा ‘भ’ देखील काढला नाही!

हे वाचलं का?

या भाषणात पुढे बोलत असताना संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंनाही फैलावर घेतलं. “आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका केली, मात्र त्यांनी शिवसेनेचा इतिहास एकदा तपासून घ्यावा. या शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे…वसंतराव नाईकांनी मुंबईतील मराठी माणूस टिकावा म्हणून शिवसेना जीवंत ठेवली. त्यांनी आम्हाला शिकवू नये”, असा टोलाही त्यांनी लगावला.

तुमच्या उमेदवाराला पाडून 15 वर्ष नगरसेवक– उत्तर सभेत वसंत मोरेंचा चंद्रकांतदादांवर निशाणा

ADVERTISEMENT

मुंबईत गडकरी चौकात मनसे विभाग अध्यक्षांनी राम रथ तयार केला. त्यात हनुमान चालिसा लावली. पोलिसांनी त्यांना पकडून नेले, रथ जप्त केला. मी पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांना विचारले, रथ का जप्त केला? तेव्हा कळाले हनुमान चालिसा लावली म्हणून शिवसेनेला डिवचायला झाले. हनुमान चालिसा, मारूती स्तोत्र लावल्यावर शिवसेना डिवचायला का होते? शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला काय झाले आहे? सध्याचे शिवसेना प्रमुखच हिंदुत्व संपवायला निघाले आहेत. माझ्या घरासमोर हनुमान चालिसा लावली तर मला डिवचायला होत नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी शिवसेनेवर टीका केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT